सीमा वरुणकरांचा शिडवणेत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीमा वरुणकरांचा शिडवणेत सत्कार
सीमा वरुणकरांचा शिडवणेत सत्कार

सीमा वरुणकरांचा शिडवणेत सत्कार

sakal_logo
By

फोटो ओव्हरसेट

L३९६१३
शिडवणे ः उपशिक्षिका सीमा वरुणकर यांचा सत्कार करताना मान्यवर.

सीमा वरुणकरांचा
शिडवणेत सत्कार
तळेरे ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ची शाळा व्यवस्थापन समितीची पालकसभा नुकतीच झाली. दिनेश रांबाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारा मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार उपशिक्षिका सीमा वरुणकर यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय पोषण आहारासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. समिता सुतार आणि सुरेश सुतार यांची स्वयंपाकी व मदतनीस म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. मुख्याध्यापक सुनील तांबे यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची माहिती दिली. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’अंतर्गत शेर्पे केंद्रस्तरीय स्पर्धेत सहभागी व विजेत्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन समारंभपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यात शफा शेख, फरीन शेख, अथर्व कुडतरकर, सेजल भोवड, लवेश कासार्डेकर, नीतेश पाटणकर, श्रेया पाळेकर, तनिष्का पाटणकर यांचा प्रामुख्याने समावेश होता. गेली तीन वर्षे सलग उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार मिळवणाऱ्या उपशिक्षिका वरुणकर यांनी यावर्षीही पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापनाने अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82609 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..