
टु २
नाना शेटये यांचा सोमवारी स्मृतीदिन
साखरपा ः नाना शेटये यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी (ता. ३१) साखरपा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद दत्ताराम शिंदे भूषवणार आहेत. या प्रसंगी वांझोळे येथील चेतन पांडेरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून दाभोळे पंचक्रोशीत काम करणारी उत्कर्ष कुणबी संस्था हिचाही सत्कार करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात गावातील शाळा आणि हाविद्यालयांमधून दहावी आणि बारावीत प्रथम आलेल्या आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होणार आह. कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित यशवंतराव आणि महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्रीधर लांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
------------
बुरंबाडमध्ये डॉ. कलाम यांना अभिवादन
साखरपा ः बुरंबाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सहाशिक्षिका नमिरा शेकासन यांनी कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. विद्यार्थी मारीया खतीब आणि आराध्य राजपूत यांनी प्रतिमेचे पूजन केले. शाळेचे मुख्याध्यापक योगेश मुळे यांनी डॉ. कलाम यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. रामेश्वर येथे घराघरात वृत्तपत्र टाकणारा सामान्य मुलगा बुद्धीच्या जोरावर देशाचा राष्ट्रपती झाला, याची आठवण त्यांनी सांगितली. तत्पूर्वी, ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे आणि त्याच काळात पोखरण अणू चाचण्यांमध्ये त्यांच्या असलेल्या महत्वाच्या भूमिकेची माहिती त्यांनी सांगितली. कलाम यांचे चरित्र अग्निपंख हे प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावे, असा आग्रह मुख्याध्यापक मुळे यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82654 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..