
गावतळे-सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थ्यांनी पाठवल्या राख्या
-rat३१p२६.jpg
L३९८४०
गावतळे ः सीमेवरील जवानांसाठी राख्या प्रा. संदीप वारके यांना सुपूर्द करताना पंचक्रोशी स्कूल समितीचे अध्यक्ष एन. वाय. पवार. आणि विद्यार्थी.
----------
सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या राख्या
गावतळेतील हायस्कूलचा उपक्रम; राष्ट्ररक्षाबंधन उपक्रमाचे १५ वे वर्ष
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १ ः सीमेवरील जवांनासाठी दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या राख्या आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे सदस्य प्रा. संदीप वारके यांच्याकडे श्रीमान मथुरमाई बुटाला हायस्कूल व ज्यु कॉलेज गावतळे पंचक्रोशी स्कूल कमिटीचे अध्यक्ष एन. वाय. पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.
श्रीमान मथुरमाई बुटाला हायस्कूल व ज्यु कॉलेज गावतळे येथे प्रा. संदीप वारके यांच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थी गेली १५ वर्षे हा उपक्रम राबवत आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षे हा उपक्रम बंद होता. या वर्षी पुन्हा विद्यार्थ्यांनी त्याच उत्साहाने सहभाग नोंदवला. काही विद्यार्थ्यांनी तर स्वतः राख्या तयार केल्या. घरातील एक राखी सीमेवरील जवांनासाठी पाठवून राष्ट्ररक्षाबंधन उपक्रम राबविण्यात सीमेवर असणारे जवान ऊन पावसाची तमा न बाळगता आपल्या देशाचे रक्षण करतात. याची सदैव आठवण ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. समस्त सैन्यशक्तीच्या अभिवादनासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी, यासाठीच हा उपक्रम ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी कारगिल युद्धानंतर कोल्हापूर येथे सुरू केला. पुढे प्रा. संदीप वारके यांनी २००५ पासून श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्यु कॉलेज येथे उपक्रमाची सुरुवात केली. विविध शाळांनी व सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदविला.
...
चौकट
यांनी केले सहकार्य..
या वर्षी उपक्रमात श्रीमान मथुरमाई बुटाला हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्रभारी मुख्याध्यापक एस. वाय. होरे, एन. एल. कालेकर, प्रा. एस. व्ही. सांवत, आवाशी शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. पाटील, भौंजाळी शाळेचे मुख्याध्यापक विश्वास भोपे, वेळवी पंचकोशी विद्यालयाचे मुध्याध्यापक एन. एम. शिंदे, छत्रपती शाहू महाराज वरिष्ठ महाविद्यालयाचे उदय शिंदे, रामराजे इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक शेखर पाटील व मराठा मंदिर स्कूलचे मुख्याध्यापक दीपक पवार, प्रशासक कुणाल मंडलिक आदींनी सहकार्य केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82657 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..