चिपळूण ः थेट सरपंचावर येणार बहुमताने अविश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः थेट सरपंचावर येणार बहुमताने अविश्वास
चिपळूण ः थेट सरपंचावर येणार बहुमताने अविश्वास

चिपळूण ः थेट सरपंचावर येणार बहुमताने अविश्वास

sakal_logo
By

39856 ः संग्रहीत
...
थेट सरपंचावर येणार बहुमताने अविश्वास

अधिनियमात सुधारणा; कार्यभार उपसरपंचांकडे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात राज्य शासनाने सुधारणा केली आहे. आता सरपंचाची थेट निवड करण्यात येणार आहे. यापूर्वीही निवड निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांतून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा केली आहे. या अधिनियमाद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची थेट निवडणूक करण्याची पद्धत अवलंबिण्यात येणार आहे. तसेच सरपंचांवर सध्या बहुमताने अविश्वास दाखल करता येईल, अशीही सुधारणा केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढील काही दिवसांत होणार आहे. त्यांना हा निर्णय लागू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यानंतर तीन आठवड्यांत थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला. यापूर्वी राज्यात भाजप शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. नंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पुन्हा सदस्यांतून सरपंच निवडीचा निर्णय झाला. आता नव्याने थेट सरपंच निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता किंवा पोटनिवडणुकीकरित सरपंच पदासाठी नामनिर्देशपत्र दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असून त्याचे वय २१ वर्षे किंवा त्यापैक्षा कमी नसावे.
....
चौकट
शिरगणती पद्धतीने साध्या बहुमताने समर्थन
ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले नसेल, ती त्या गावच्या कोणत्याही प्रभागासाठी सदस्य म्हणून किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पात्र नसेल या अधिनियमात थेट निवडून आलेल्या सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्तावास ग्रामसभेद्वारे शिरगणती करण्याच्या पद्धतीने साध्या बहुमताने समर्थन देण्यात येईल, असेही नमूद केले आहे. या अविश्वास प्रस्तावास समर्थन दिल्यानंतर सरपंचास देण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार उपसरपंचाकडे देण्यात येतील.
...
चौकट
दोघांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आल्यास..
जर सरपंच आणि उपसरपंच या दोघांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असेल, तर असा अविश्वास प्रस्ताव निर्णित होईपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांकडून प्राधिकृत करण्यात येईल आणि हा अधिकार विस्तार अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकंडे देण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82665 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top