संक्षिप्त-1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-1
संक्षिप्त-1

संक्षिप्त-1

sakal_logo
By

वालावल विद्यालयास
सव्वा लाखाची देणगी
कुडाळ, ता. ३१ ः वालावल येथील नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालयाला तीन नवीन संगणक संच व तत्सम साहित्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची देणगी देण्यात आली. जोगेश्वरी येथील शमीराज मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टमार्फत यासाठी आर्थिक सहकार्य केले. विद्यालयाच्या शतकी वाटचालीनिमित्त शमीराज ट्रस्टकडून ही मदत करण्यात आली.
---------------
वसोली विद्यालयास
शैक्षणिक साहित्य
माणगाव, ता. ३१ ः उमेद फाउंडेशन सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने वसोली विद्यालयातील पाच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वसोली विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी शिक्षक मनोज गुंजाळ यांचे सहकार्य लाभले. उमेद फाउंडेशनसह मनोज गुंजाळ यांचे आभार वसोली विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित परब यांनी मानले.
---------------
कळणेत शैक्षणिक
साहित्य वितरण
दोडामार्ग, ता. ३१ ः कळणे नूतन विद्यालयाला बांदा उमेद फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. चार स्कूलबॅग, वह्या, कंपास बॉक्स, रंगपेटी, वॉटर बॉटल, रायटिंग पॅड आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण झाले. जिल्हा परिषद माजी सदस्या संपदा देसाई यांच्या हस्ते एकूण २७ विद्यार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी शाळा समिती निमंत्रित सदस्य संकेत देसाई, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी प्रशालेच्या राजश्री देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.
--------------
नाटळात गव्यांकडून
शेतकर्‍यांचा पाठलाग
कणकवली, ता. ३१ ः नाटळ येथे गव्यांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा गवारेड्यांनी पाठलाग गेला. यामुळे घाबरून शेतकर्‍यांना पळत जात झाडाचा आधार घ्यावा लागला. गवारेड्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नाटळ गावातील पिंपळाचा माळ आणि थोरले मोहूळ या परिसरात गवारेड्यांच्या कळपांचा व सांबरांच्या कळपाचा मुक्त संचार सुरू आहे. परिसरातील शेतात गव्यांनी धुडगूस घातला आहे. याबाबत वन विभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.
---------------
मालवणात ११ ला
गुणगौरव सोहळा
मालवण, ता. ३१ ः तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून ११ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित केलेला आहे. दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व अन्य क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले असल्यास तेही विद्यार्थी सत्कारास पात्र असतील. ७५ टक्केहून अधिक गूण मिळविणार्‍या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच इतर क्षेत्रातही विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यापारी पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. व्यापारी बांधवांनी गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसह आपल्या पाल्यांची नावे कार्यवाह रवी तळाशीलकर, खजिनदार गणेश प्रभूलकर यांच्याकडे ७ ऑगस्टपर्यंत द्यावीत, असे आवाहन मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी केले आहे.
.....................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82668 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top