मालवणात ११ला गुणगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात ११ला गुणगौरव
मालवणात ११ला गुणगौरव

मालवणात ११ला गुणगौरव

sakal_logo
By

मालवणात ११ला गुणगौरव
मालवण ः तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून ११ ऑगस्टला सायंकाळी साडेपाचला दैवज्ञ भवन, मालवण येथे करण्यात येणार आहे. दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व अन्य क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी सत्कारास पात्र असतील. ७५ टक्केहून अधिक गूण मिळविणाऱ्या गुणवंतांना गौरविण्यात येणार आहे. तसेच इतर क्षेत्रातही विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यापारी पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. व्यापारी बांधवांनी गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसह पाल्यांची नावे कार्यवाह रवी तळाशीलकर, खजिनदार गणेश प्रभूलकर यांच्याकडे ७ ऑगस्टपर्यंत द्यावीत, असे आवाहन मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी केले आहे.
--
कळणेत शैक्षणिक साहित्य वितरण
दोडामार्ग ः कळणे नूतन विद्यालयाला बांदा उमेद फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. चार स्कूलबॅग, वह्या, कंपास बॉक्स, रंगपेटी, वॉटर बॉटल, रायटिंग पॅड आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण झाले. जिल्हा परिषद माजी सदस्या संपदा देसाई यांच्या हस्ते एकूण २७ विद्यार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी शाळा समिती निमंत्रित सदस्य संकेत देसाई, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी प्रशालेच्या राजश्री देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.
---
वालावल विद्यालयास देणगी
कुडाळ ः वालावल येथील नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालयाला तीन नवीन संगणक संच व तत्सम साहित्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची देणगी देण्यात आली. जोगेश्वरी येथील शमीराज मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टमार्फत यासाठी आर्थिक सहकार्य केले. विद्यालयाच्या शतकी वाटचालीनिमित्त शमीराज ट्रस्टकडून ही मदत करण्यात आली.
---------------
वसोली विद्यालयास साहित्य भेट
माणगाव ः उमेद फाउंडेशन सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने वसोली विद्यालयातील पाच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वसोली विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी शिक्षक मनोज गुंजाळ यांचे सहकार्य लाभले. उमेद फाउंडेशनसह मनोज गुंजाळ यांचे आभार वसोली विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित परब यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82764 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top