महिलांसाठी शिवणकाम, ब्यूटिशियन प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांसाठी शिवणकाम, ब्यूटिशियन प्रशिक्षण
महिलांसाठी शिवणकाम, ब्यूटिशियन प्रशिक्षण

महिलांसाठी शिवणकाम, ब्यूटिशियन प्रशिक्षण

sakal_logo
By

rat1p14.jpg
39926
कुंबळेः आयोजित कार्यक्रमास कौशल्य प्रशिक्षणवर्गात संस्थेच्या कार्याची माहिती देताना पदाधिकारी व उपस्थित महिला.
---------
महिलांसाठी शिवणकाम,
ब्यूटिशियन प्रशिक्षण
कुंबळे ग्रामपंचायत व प्रथम संस्था; महिलांचा प्रतिसाद
मंडणगड, ता. १ ः ग्रामीण भागातील महिलांनी रोजगार व स्वयंरोजगाराची वाट चोखाळून आत्मनिर्भर बनून स्वावलंबी बनावे याकरिता प्रथम एज्युकेशन संस्था यांच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण कुंबळे येथे दिले जात आहे. भारत सरकारच्या कुशल मनुष्यबळ विकास कार्यक्रमांर्तगत ग्रामीण भागातील महिला व मुलांनी स्वावलंबी बनावे, आपला रोजगार शोधून स्पर्धेच्या काळात कुंटबांचे आधार बनावे याकरिता त्यांना तंत्र प्रशिक्षित करण्यासाठी कुंबळे येथे शिवणकाम व ब्यूटिशियन हे दोन महिन्यांचे प्रशिक्षण क्रम आयोजित केले आहेत. पंचक्रोशीतील महिला व मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे याकरिता केवळ तंत्र प्रशिक्षित न करता त्यांच्यामध्ये उद्योजकीय गुण व व्यक्तिमत्व निर्माण व्हावे याकरिता ही संस्था प्रयत्नशील आहे. याकरिता आपले व्यवसाय फायद्यात जाईल याकरिता आपल्या व्यवसायाचे समायोजन कसे करावे, यासाठी तंत्र माहितीबरोबरच व्यवसायाचे नफा-तोटा गणिते जाहिरात व त्याकरिता समाजमाध्यमांचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षणही महिलांना दिले जात आहे.
या प्रशिक्षणक्रमाबरोबरच ग्रामीण भागातील महिला, मुली व मुलांसाठी संगणक प्रशिक्षण, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, हेल्थकेअर, ब्यूटिशियन इद्यादी विषयांचे कमी कालावधीचे अभ्यासक्रम संस्थेने विकसित केले आहेत व तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीपर्यंत पोहचून रोजगार व स्वंयरोजागार चालन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. या कामी कुंबळे ग्रामपंचायात संस्थेस संपूर्ण सहकार्य करत आहे. अभ्यासक्रम माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमास संस्थेचे सल्लागार रवींद्र शेट्ये, प्रोग्राम मॅनेजर ऋुता माने, कोमल बामणे, मंगेश दळवी, समिक्षा लोखंडे, सरपंच किशोर दळवी उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82822 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top