अभ्यंकर विद्यामंदिरात बालसभेत टिळकांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्यंकर विद्यामंदिरात बालसभेत टिळकांना अभिवादन
अभ्यंकर विद्यामंदिरात बालसभेत टिळकांना अभिवादन

अभ्यंकर विद्यामंदिरात बालसभेत टिळकांना अभिवादन

sakal_logo
By

rat1p1.jpg-
39915
रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह मुख्याध्यापक विनोद नारकर आणि सर्व शिक्षक, शिक्षिका.
--------------
अभ्यंकर विद्यामंदिरात
बालसभेत टिळकांना अभिवादन
वक्तृत्व स्पर्धा ; विजेत्यांना बक्षीस वितरण
रत्नागिरी, ता. १ : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित मुख्याध्यापक विनोद नारकर, शिक्षक प्रकाश कदम यांनी लोकमान्य टिळक व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
टिळक जयंतीदिनी म्हणजे २३ जुलैला प्रत्येक वर्गात लोकमान्य टिळकांविषयी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज पुण्यतिथीदिनी करण्यात आले. कार्यक्रमात शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. आजच्या कार्यक्रमात प्रत्येक इयत्तेच्या प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्याने भाषण केले. कार्यक्रम इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची बालसभा घेऊन साजरा करण्यात आला. बालसभेचे अध्यक्षस्थान अन्वित डांगे याने भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना मलुष्टे हिने केले. विद्या लिंगायतने आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, प्रशस्तीपत्रकप्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच बालसभेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

चौकट
वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी (प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ या क्रमाने)
पहिली - प्रार्थना बोरकर, श्रीशांत दिवाडकर, सान्वी गावखडकर, उत्तेजनार्थ- देवाशिष जोशी, प्रीती कोळगे, लावण्या मायंगडे, रेयांश पेजे, शर्व गावडे, मोहित सुवरे.
दुसरी- श्रीरंग दामले, सुमुख काळे, मनवा मालप, उत्तेजनार्थ- वरद गावखडकर, अवनिश फडके, ओजस्या गोगटे, ओवी साळवी, गौरी शेट्ये, चैतन्य लिंगायत.
तिसरी- स्पृहा भावे, अन्वित डांगे, आराध्य महाडिक, दुर्वा मुरुडकर, गार्गी देवल, स्वरा थोरात, ध्रुव बुरोंडकर, आदित्य घडशी, आदित्य गोठणकर, चिन्मय दामले.
चौथी- अर्णव पटवर्धन, स्वरा साळुंखे, तृतीय (विभागून)- निधी जोशी, निर्मयी जोशी, उत्तेजनार्थ- मुद्रा जोशी, रिद्धी पवार, मानस लिंगायत, आस्था कांबळे, आरोही आलिम.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82825 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..