शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहा
शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहा

शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहा

sakal_logo
By

L३९९७२

- माड्याचीवाडी ः येथील बैठकीत बोलताना वैभव नाईक. सोबत संजय पडते, वर्षा कुडाळकर, जान्हवी सावंत, शेखर गावडे आदी.

शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहा
वैभव नाईक ः डिगस, माड्याचीवाडीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गावागावात हजारोंच्या संख्येने शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली. ही सदस्य नोंदणी हाच जनतेचा शिवसेना व उद्धव ठाकरेंवरील विश्वास आहे. कुडाळ तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. असंख्य शिवसैनिकांनी मेहनतीने तो राखला आहे. त्यामुळे कितीही दडपणे, आमिषे आली, तरी आपली मेहनत वाया जाऊ देऊ नका. शिवसेनेची ताकद अजून वाढवायची असून त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम राहा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना केले.
शिवसेना जिल्हाप्रमख तथा आमदार नाईक, जिल्हाप्रमख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत कडावल जिल्हा परिषद मतदार संघाची बैठक डिगस येथे, तर नेरूर जिल्हा परिषद मतदार संघाची बैठक माड्याचीवाडी येथे शुक्रवारी (ता. २९) झाली. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, माजी उपसभापती जयभारत पालव, रुपेश पावसकर, माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, कडावल विभागप्रमुख नरेंद्र राणे, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, बाळा पावसकर, मंजुनाथ फडके, दिलीप सावंत, सुनील सावंत, विद्याधर मुंज, अमित कल्याणकर, अनिरुध्द करंदीकर, मुकुंद सरनोबत, मंदार खोटावळे, संकेत सावंत, तुकाराम निरुखेकर, आनंद मार्गज, अमोल सावंत, नेरूर विभागातील एम. बी. गावडे, रोहित चव्हाण, शामसुंदर परब, प्रवीण नेरुरकर, दीपेश कदम, सचिन गावडे, सचिन परब, बाळा गावडे, संदीप वारंग, सुभाष परब आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82829 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..