चिपळूण ः सारा शहर शिवसेनेचा, कोण आहे पक्षाचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः सारा शहर शिवसेनेचा, कोण आहे पक्षाचा?
चिपळूण ः सारा शहर शिवसेनेचा, कोण आहे पक्षाचा?

चिपळूण ः सारा शहर शिवसेनेचा, कोण आहे पक्षाचा?

sakal_logo
By

39993 ः संग्रहीत (फोटो वापरावा)
....
सारे शहर शिवसेनेचे, कोण आहे पक्षाचे?

सेनेतील दोन्ही गटात संभ्रम; साडेसातशे प्रतिज्ञानपत्र तयार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय युद्धात सच्च्या शिवसैनिकांची घुसमट होत आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते आम्ही शिवसेनेचेच, असे म्हणत आहेत; मात्र शिवसेनेवरील त्यांची निष्ठा सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र करून घेतले जात आहे. सारा शहर शिवसेनेचा, कोण आहे पक्षाचा? अशी विचारणाही या निमित्ताने केली जात आहे. चिपळूण तालुक्यातून आतापर्यंत साडेसातशेहून अधिक प्रतिज्ञापत्र करून घेण्यात आले आहेत.
ज्या तत्त्वांनी पक्षाची उभारणी झाली, त्या तत्त्वांना प्राधान्य देणे हे सर्वपक्षीय नेत्यांची प्रमुख जबाबदारी असते; परंतु राजकारणातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे पक्षीय तत्त्वांना तिलांजली देण्याचे काम सर्वच पक्षांकडून कमी-अधिक प्रमाणात होत आहे. तेच आता शिवसेनेतही होत आहे. राज्यस्तरावर स्वः अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे-शिंदे यांच्यामध्ये रणकंदन सुरू आहे. हा राज्याचा राजकीय पॅटर्न स्थानिक स्तरावर कार्यकर्ते अंमलात आणत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोन गटात विखुरले आहेत. आपली ताकद दाखवण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले जात आहे. गुप्त पद्धतीने शिवसेनेला पोखरण्याचे काम शिंदे गटाकडून सुरू आहे.
स्थानिक आमदार नसला तरी शिवसेनेचा मंत्री, खासदार आणि पालिकेत सर्वाधिक नगरसेवक असा सुवर्णकाळ अडीच वर्ष येथील शिवसैनिकांनी पाहिला; पण सामान्य शिवसैनिकांना त्याचा काहीच लाभ झाला नाही. नेत्यांच्या मागे फिरून ठराविक नेत्यांनी आपले वजन वाढवले. सर्व अर्थाने वाढलेल्या नेत्यांची महत्वाकांक्षा आता वाढली आहे. तेच आता गटातटात विखुरले आहेत. सर्वार्थाने वाढलेल्या नेत्यांची मोट बांधण्याचे आव्हान नेतृत्वासमोर आहे.
आगामी पालिका निवडणुकीत कुणाचा पत्ता कापायचा आणि आपल्याला कसे पालिकेत जाता येईल, याची बांधणी आता सुरू झाली आहे. चिपळूण तालुक्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्राधान्य दिले असले तरी पालिका निवडणुकीत ते शिवसेनेलाच प्राधान्य देतील, असेही सांगितले जात होते. तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ती विखुरली गेली आहे. पक्षातच निर्माण झालेल्या नव्या गटामुळे शिवसेना कुणाची?, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र करून घेतले जात आहेत. आपला शहर आणि तालुका शिवसेनेचा असला तरी पक्षाचा खरा कार्यकर्ता कोण, हे दाखवण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर आली आहे, असे सांगत प्रतिज्ञापत्र करून घेतले जात आहेत.
...
चौकट
आम्ही उद्धवसाहेबांसोबत..
राज्यातील सत्तांतरामुळे पक्षप्रमुख राजकीय अस्थिरतेच्या कचाट्यात अडकल्याने स्थानिक स्तरावरील कार्यकर्तादेखील तत्त्वनिष्ठा बाजूला सारून पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हित पाहत आहे. आपण ठाकरेंसोबत आहोत, हे सिद्ध करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. पक्षाच्या अस्तित्वासाठी घेण्यात येणाऱ्या या बैठकीत आम्ही उद्धवसाहेबांसोबत, असे लेखी हमी पत्र पदाधिकाऱ्यांकडून घेतले जात आहे.
---------------
चौकट
खरा चेहरा निवडणुकीत होईल स्पष्ट
पक्षाची उभारणी ही हमीपत्रावर नव्हे, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर झालेली असते. पत्र दिले तरी पक्षचिन्हावर निष्ठा असलेल्या खऱ्या कार्यकर्त्यांचा चेहरा निवडणुकीपूर्वी स्पष्ट होणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करणे, पक्षाची प्रतिमा उभी करणे आणि पालिकेच्या मैदानात दंड थोपटत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करून दाखवणे हीच शिवसेनेची खरी लढाई असणार आहे.
---------------
कोट
आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, हे सिद्ध करण्यासाठी लेखी हमीपत्र लिहून देण्याची वेळ शिवसैनिकांवर आली हे खरे आहे; परंतु शहरातील शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लेखी पत्र नव्हे तर सगळा खेळ शिवसेनेच्या चिन्हाचा आहे. या परीक्षेतही आम्ही यशस्वी होऊ. येणारा काळ शिवसेनेसाठी सुवर्णकाळ असेल.
-संदीप सावंत, तालुकाप्रमुख शिवसेना

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82859 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top