
कणकवली : गुरूपौर्णिमा उत्सव
L39994
कणकवली : येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या गुरूपौर्णिमा उत्सवात पंडित समीर दुबळे यांनी शास्त्रीय गायन सादर केले.
शास्त्रीय संगीत आत्मसाथ करण्यासाठी दृढनिश्चय हवा
पं. समीर दुबळे : आचरेकर प्रतिष्ठानच्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा समारोप
कणकवली, ता.१ : शास्त्रीय संगीत शिकायचे असेल तर दृढनिश्चय करावा लागतो. कठोर साधनेची तयारी ठेवायला हवी. मी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी नेटाने प्रयत्न करीत राहिलो, त्यामुळेच मी या कलेत परंगत होऊ शकलो. माझे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते, असे प्रतिपादन पंडित समीर दुबळे यांनी केले.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित पंडित जितेंद्र अभिषेकी सधन गान शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी, गुरु पंडित समीर दुबळे यांना त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी श्री.दुबळे बोलत होते. यावेळी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, सुजाता जोशी, प्रादेश जोशी, बाळ नाडकर्णी, कार्यवाह नानू देसाई,लीना काळसेकर,राजा राजाध्यक्ष,प्रसन्ना देसाई, मिलिंद बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दुबळे म्हणाले, कोणत्याही कलेचा अभ्यास करायचा म्हटले की लोकांना पळ काढावासा वाटतो. ही सध्याची सामाजिक प्रवृत्ती दिसते. अभ्यास न करता कोणत्याही कला शिकण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करण्याकडे लोकांमध्ये कल वाढत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. मात्र शास्त्रीय संगीत शिकायचे असेल खूप साधना करावी लागते. तेव्हाच ही कला तुम्ही अवगत करु शकता. तसेच मी डिमांड करणारा शिक्षक असून शिष्यांकडून डिमांड आल्याशिवाय पुढील शिक्षण मी देत नाही, असेही त्यांनी सांगितले.
पल्लवी पिळणकर, मृदुला तांबे, निलेश धाक्रस यांचे गायन झाले. त्यांनी आपल्या गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी या कार्यक्रमात पं. दुबळे यांचा त्यांच्या शिष्यांनी सत्कार केला. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने पं. दुबळे यांचा अध्यक्ष वामन पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार शरद सावंत यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता पं. समीर दुबळे यांच्या गायनाने झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82876 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..