कणकवली : सर्पमित्र गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : सर्पमित्र गौरव
कणकवली : सर्पमित्र गौरव

कणकवली : सर्पमित्र गौरव

sakal_logo
By

L40017
कणकवली : तालुक्‍यातील सर्पमित्रांचा ओसरगाव येथे सत्‍कार होणार आहे.

तालुक्‍यातील सर्पमित्रांचा ओसरगाव गौरव
नागपंचमीचे औचित्‍य : ओसरगाव तलावकाठी मान्यवरांची उपस्थिती
कणकवली : नागपंचमी सणाचे औचित्य साधून उद्या 2 ऑगस्टला दुपारी तीन वाजता कणकवली तालुक्‍यातील सर्पमित्रांचा गौरव होणार आहे. या कार्यक्रमाला तहसीलदार रमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.घर, गोठे आदी ठिकाणी आलेल्‍या सापांना पकडून त्‍यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याची जबाबदारी तालुक्‍यातील अनेक सर्पमित्रांकडून पार पाडली जात आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच स्वतःची पदर मोड करून हे सर्पमित्र सेवाभावी कार्य करत आहेत. तालुक्‍यातील अशा जिगरबाज सर्पमित्रांचा गौरव नागपंचमी सणाच्या औचित्‍यावर ओसरगाववासीयांच्यावतीने होणार आहे.या कार्यक्रमाला प्राणी मित्र निसर्गप्रेमी ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्पमित्र अंकुर जाधव, संकेत सावंत, यज्ञेश खरात, तन्मय आंगणे, चैतन्य निगरे, यश वर्दम, मनीष सावंत, मयुरेश केळुस्कर यांचा प्रमुख सत्कार केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82897 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..