वेळेचे भान ठेवा नाहीतर कारवाईला सामोरे जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेळेचे भान ठेवा नाहीतर कारवाईला सामोरे जा
वेळेचे भान ठेवा नाहीतर कारवाईला सामोरे जा

वेळेचे भान ठेवा नाहीतर कारवाईला सामोरे जा

sakal_logo
By

चिपळूण पंचायत समिती--लोगो

अधिकारी, कर्मचारी नसल्याने ग्रामस्थ ताटकळत
बीडीओंची कडक भूमिका ; वेळेत उपस्थित नसल्यास कारवाई करणार
चिपळूण, ता. १ः ग्रामीण भागातील विविध लोक विविध कामांसाठी पंचायत समितीत येत असतात; मात्र पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नाहीत. याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत आहेत. याची दखल घेत गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी पंचायत समितीअंतर्गत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याची सूचना केली. तशी नोटीस सर्व विभागांना देण्यात आली असून त्यात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पंचायत समितीमधील ग्रामपंचायत, बांधकाम, पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, महिला बालकल्याण, आरोग्य आदी विभागातील विविध कामांसाठी तालुक्यातील ग्रामस्थांची नियमितपणे ये-जा सुरू असते. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेत उपस्थित राहतात; मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन राहिलेले नाही. कितीही गटविकास आले आणि गेले तरी बेशिस्त कर्मचाऱ्यांनी आपला पायंडा मोडलेला नाही. दुपारी घरी जेवायला गेलेले हे कर्मचारी बिनधास्तपणे आपल्या वेळेनुसार कार्यालयात उपस्थित राहतात. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी आलेले ग्रामस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसतात. परिणामी त्याच दिवशी काम न झाल्यास पुन्हा त्यांना पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागतात.
पंचायत समितीचा कारभार स्वीकारलेल्या गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांना त्याची गंभीरपणे दखल घेतली आहे. त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील लोकांची वेळेत काम करणे अधिकारी व कर्मचऱ्यांचे कर्तव्य आहे. एखाद्याच्या कामात काही अडचणी असल्यास त्यांना माहिती द्यायला हवी. सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्त पाळलीच पाहिजे. विभागप्रमुखांनी सोमवारी व गुरुवारी दिवसभर कार्यालयात थांबलेच पाहिजे. कार्यालयीन कामकाजासाठी फिरतीवर गेल्यास त्याची माहिती कार्यालयास असावी. पहिल्या टप्प्यात सर्वांनाच वेळेत उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या आहेत.

चौकट
नेहमीच बेशिस्त वागणाऱ्यांची खोड मोडणार
जे नेहमीच बेशिस्त वागतात त्यांचा शोध घेतला आहे. सूचना देऊनही त्यांच्यात फरक पडला नाही तर कारवाईद्वारे त्यांची खोड मोडली जाईल. ग्रामसेवकांनाही याबाबतच्या सूचना बैठकीदरम्यान देण्यात आल्या असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत. या योजनांचा लाभ संबंधित घटकांना होण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे गटविकास अधिकारी घार्गे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82907 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top