रत्नागिरी-श्रावण सोमवारनिमित्त शंकराच्या मंदिरात गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-श्रावण सोमवारनिमित्त शंकराच्या मंदिरात गर्दी
रत्नागिरी-श्रावण सोमवारनिमित्त शंकराच्या मंदिरात गर्दी

रत्नागिरी-श्रावण सोमवारनिमित्त शंकराच्या मंदिरात गर्दी

sakal_logo
By

rat1p31.jpg
40037
रत्नागिरीः राजिवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला. पहिल्या छायाचित्रात काशिविश्वेश्वराच्या मुखवट्याची पूजा आणि दुसऱ्या छायाचित्रात भजनात दंग असलेले भाविक.
-----------------
श्रावण सोमवारनिमित्त
महादेवाचा जयघोष
मंदिरांमध्ये गर्दी ; हरिनाम गजर
रत्नागिरी, ता. १ः पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी आज विविध ठिकाणच्या श्री शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी रिघ लावली. शहरातील तृणबिंदूकेश्वर मंदिर, भागेश्वर मंदिर, राजिवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिर, मांडवीतील श्री भैरव मंदिरात भाविकांची गर्दी झाली. गावागावांतील मंदिरात हरिनाम गजर सप्ताहांनाही आजपासून सुरवात झाली. काही गावांत एक दिवसीय गजरही आयोजित करण्यात आला.
कोरोना महामारीत दोन वर्षे श्रावणात नियम पाळून दर्शन घेता येत होते. आता मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने श्रावणातील सण, व्रतवैकल्ये साजरे होत असल्यामुळे नागरिकही आनंदित आहेत. दरवर्षी श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची शिवशंभूच्या मंदिरात गर्दी पाहायला मिळते. हरिनाम गजर सोहळ्यात स्थानिक, वाडीतील मंडळी आठवडाभर न थांबता हरिनाम गजर करतात. दुसऱ्या सोमवारी त्याची सांगता होते. आजही प्रथा, परंपरा मोठ्या भक्तीभावाने पाळली जाते. पुढील सोमवारी रत्नागिरीतील राजीवड्यातील काशिविश्‍वेश्‍वर आणि मांडवीतील भैरवाच्या पालखीची विश्वेश्वर घाटीमध्ये भेट पाहायला मिळणार आहे. ढोलताशांच्या गजरात ही भेट होणार असल्याने भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तृणबिंदूकेश्वर मंदिरात भाविकांची आज प्रचंड गर्दी झाली. या मंदिरात श्रावण प्रतिपदेपासून संततधार रूद्रानुष्ठानाला सुरवात झाली आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज पहिल्या सोमवारनिमित्त भाविकांची रिघ लागली. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरातही भाविक दर्शनासाठी आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82916 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..