लोटेत सेनेतर्फे रुग्णांना फळवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोटेत सेनेतर्फे रुग्णांना फळवाटप
लोटेत सेनेतर्फे रुग्णांना फळवाटप

लोटेत सेनेतर्फे रुग्णांना फळवाटप

sakal_logo
By

ratchl13.jpg
39990
लोटेः रुग्णांना फळवाटप प्रसंगी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी.
---------------
लोटेत सेनेतर्फे रुग्णांना फळवाटप
चिपळूणः शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना लोटे तसेच सरपंच चंद्रकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम हॉस्पिटलमधील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळाराम चाळके, माजी सरपंच सुरेंद्र चाळके, रवींद्र गोवळकर, दीपक आंब्रे, मच्छिंद्र गोवळकर, चेतन वारणकर, संकेत चाळके, सुधाकर चाळके, भाई कडू, रूपेश काते उपस्थित होते.
--------------
ratchl14.jpg
39991
चिपळूणः प्रभातफेरीत सहभागी मंदार इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी.
-----------
मंदारमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम
चिपळूण ः तालुक्यातील पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या मंदार इंग्लिश स्कूलमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी 8 ते 9 चित्रकला व घोषवाक्य, 10.35 ते 12.30 निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या निमित्ताने प्रभातफेरीचेदेखील आयोजन केले होते.
----------
rat1p18.jpg
39959
राजापूरः सुजल चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना शिक्षिका ललिता जाधव. शेजारी मुख्याध्यापक संदीप परटवलकर, सचिन पाटील.
-----------
चित्रकला स्पर्धेत सुजल चव्हाणचे सुयश
राजापूरः आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत केंद्रातर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये करक येथील जिल्हा परिषद शाळा नं. ३ चा विद्यार्थी सुजल चव्हाण याने कारवली केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशोदीप जाधव याने कारवली केंद्रामध्ये प्रथम क्रमांक तर भागेश्री थोटम हिने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांचे मुख्याध्यापक संदीप परटवलकर, शिक्षिका ललिता जाधव, सचिन पाटील यांनी अभिनंदन केले.
-------
rat1p4.jpg
39918
चिपळूणः रफिक मोडक यांच्या कार्याचा गौरव करताना आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड व मान्यवर.
---------------
रफीक मोडक यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
चिपळूणः सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रफिक मोडक यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ भाऊसाहेब महाडिक सभागृहात झाला. या वेळी आमदार शेखर निकम, युगंधरा राजेशिर्के, सुनील पाध्ये, अशोक काजरोळकर, सुरेश सावर्डेकर, विजय गुजर, शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला बाबासाहेब भुवड, संचालक शांताराम खानविलकर, मारूतीराव घाग, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, कलाजीवन गौरव पुरस्कार विजेते प्रकाश राजेशिर्के, युगंधरा राजेशिर्के, पूजा निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82917 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top