सूर्यकांत घाडींची बिनविरोध निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यकांत घाडींची बिनविरोध निवड
सूर्यकांत घाडींची बिनविरोध निवड

सूर्यकांत घाडींची बिनविरोध निवड

sakal_logo
By

40038
आचरा ः सूर्यकांत घाडी यांचे अभिनंदन करताना पदाधिकारी.

घाडीगावकर समाज जिल्हाध्यक्षपदी
सूर्यकांत घाडींची बिनविरोध निवड
आचरा ः क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज मुंबई विभाग सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी सूर्यकांत घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी विजय घाडी यांची निवड झाली. कणकवली प्राथमिक शाळा येथे निवडणूक निर्णय अधिकारी सहदेव दाभोळकर यांच्या अध्यक्षक्षतेखाली आणि समाज संघटक विजय गावकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सचिवपदी प्रदीप घाडी, सहसचिव बुधाजी घाडीगावकर, खजिनदार सुनील गावकर यांची निवड केली. सदस्यपदी अर्जुन बापर्डेकर, विलास गावकर, आत्माराम घाडीगावकर, सत्यवान घाडीगावकर, कैलास घाडीगावकर, उमेश घाडी, भिसाजी घाडीगावकर, अशोक घाडी, उमेश घाडीगावकर, प्रीतम घाडीगावकर, तर अंतर्गत हिशोब तपासनीस म्हणून दत्तगुरू घाडीगावकर यांची निवड करण्यात आली. समितीच्यावतीने मध्य कार्यकारिणी सदस्य म्हणून लक्ष्मण घाडीगावकर यांची निवड केली. समाजाच्या उत्कर्षासाठी सर्व बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन नूतन अध्यक्ष घाडी यांनी केले.
..............
40039
आचरा ः कथामाला कार्यक्रमात सहभागी मुलांसह मान्यवर.

आचरा उर्दू शाळेत कथामाला
आचरा ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा विशेष कार्यक्रम नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, आचरा येथे झाला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर होते. प्रारंभी मुलांनी ‘किराते कुराण’ पठण केले. त्यानंतर ‘खरा तो एकची धर्म’ ही साने गुरुजींची प्रार्थना सुस्वरात सादर केली. कथामालेच्या फलकाचे उद्‍घाटन कार्यकर्त्या आस्मा मुजावर यांच्या हस्ते झाले. मुलांनी उर्दूतून कथाकथन आणि समूहगान सादर केले. सुरेश ठाकूर यांनी कथा कशा कथन कराव्यात, याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच कथाकथनही केले. मनोरंजनात्मक विविध खेळ घेतले. मुख्याध्यापक निसार सोलकर, सय्यद मुश्ताक, सय्यद मुसा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमास अजहरून्निसा सोलकर, जुलेखा आगा, तबस्सूम मुजावर, नाझिया खान, तन्जिल शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82921 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..