
पान दोन मेन-महसूल विभागात जनसेवेची संधी
L४००४२
ओळ - मालवण ः तालुक्यात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आला.
महसूल विभागात जनसेवेची संधी
अजय पाटणे ः मालवणात महसूल दिन उत्साहात साजरा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ ः शासकीय सेवा बजावत असताना जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असलेला विभाग म्हणजे महसूल. जनतेच्या मोठ्या अपेक्षा या विभागाकडून असतात. त्या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी या विभागात काम करणाऱ्या आपल्या सर्वांची आहे. यापुढेही प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण करून मालवण तालुका सर्व क्षेत्रात अग्रेसर ठेवावा, असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले.
येथील तहसील कार्यालयात तहसीलदार पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार आनंद मालवणकर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील उपस्थित होते.
यावेळी तालुकास्तरावर सर्वोत्तम काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात विशेष सत्कार करण्यात आला. यात महसूल नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल अव्वल कारकून आर. पी. मोंडकर, मसुरे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण, महसूल सहाय्यक गणेश कुबल, कट्टा तलाठी नीलम नारकर, देवली कोतवाल हरी देऊलकर, पोलिस पाटील विठ्ठल बावकर यांना तहसीलदार पाटणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एस. आर. चव्हाण, नीलम नारकर, हरी देऊलकर यांना तालुकास्तरावरील सर्वोत्तम कामगिरीबत जिल्हास्तरावरही सन्मानित करण्यात येत असल्याचे तहसीलदार पाटणे यांनी सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थितांनी विचार मांडले.
.............
सामान्य जनतेच्या सेवेची संधी
महसूल विभागांतर्गत अनेक विभाग येतात. सर्वसामान्य जनतेसह सर्व स्तरातील जनतेची कामे या विभागांशी निगडीत असतात. प्राधान्याने सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची मोठी संधी महसूल विभागात काम करताना आपल्याला मिळते, हे आपले भाग्यच आहे. सोबत शासनस्तरावरील अनेक योजना राबविणे, त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, आपत्ती काळात सेवा बजावणे, निवडणूक काळात जबाबदारीपूर्वक काम करणे हे सर्वच महसूल विभागांतर्गत येते. तालुक्याचा गेल्या काही वर्षांचा विचार करता कमी कर्मचारी संख्या असतानाही प्रत्येकजण अधिकची जबाबदारी घेऊन चांगले काम करत आहे. कोरोना काळात, तोक्ते वादळातही सर्वांनी चांगले काम केले, असे कौतुकोद्गार तहसीलदार पाटणे यांनी व्यक्त काढले.
तालुक्यात दरवर्षी महसूल उत्पन्न हे वाढतेच राहिले आहे. या महसुली वर्षातही जमीन महसूल १ कोटी ५९ हजार, तर गौण खनिज दंड स्वरुपात सुमारे २४ वाहनांवर कारवाईतून ६० लाख ७८ हजार वसुल करण्यात आले. असा एकूण १ कोटी ६१ लाख ३७ हजार महसूल गोळा झाला आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82925 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..