संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

सोलगाव शाळेत
प्रभातफेरी
राजापूर, ता. ः देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गंत तालुक्यातील सोलगाव येथील आदर्श शाळा सोलगांव नं. 2 येथे जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरामध्ये देशभक्तीपर घोषणा देत ही प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये मुलांसमवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, उपाध्यक्षा रूपाली मल्हार, मुख्याध्यापक दीपक धामापूरकर, ज्ञानेश्वर मगदूम, नारायण नांगरेकर, संगीता नवाळे, माधवी आईर, शमिका गिजम, भिकाजी मल्हार, शंकर गोर्ले, जयवंत नाखरेकर यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
----------
राजापूर हायस्कूलमध्ये
जनजागृती फेरी
राजापूर ः हर घर तिरंगा उपक्रमांतर्गंत शहरातील राजापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फेरी काढून जनजागृती केली. या फेरीमध्ये मुलांसमवेत राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाही प्रकाश भावे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अभय मेळेकर, मुख्याध्यापक भालशंकर, उपमुख्याध्यापक पोवर, पर्यवेक्षक चव्हाण यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
-----

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82929 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..