
गुहागर ः यशवंत होताना समाज, गाव विसरू नका
rat1p30.jpg ः
40035
गुहागरः पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करताना भंडारी समाजाचे उपाध्यक्ष नीलेश सुर्वे.
-----------------
यशवंत होताना समाज, गाव विसरू नका
नीलेश सुर्वे ; भंडारी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार
गुहागर, ता. १ ः भविष्यात आपण यशवंत, कीर्तीवंत व्हावे; मात्र त्या वेळी आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या समाजाला, गावाला, शाळेला विसरू नका, असा सल्ला भंडारी समाजाचे उपाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते भंडारी समाजाच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
गुहागर तालुका भंडारी समाज या संस्थेतर्फे दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, अन्य व्यावसायिक शिक्षण आणि क्रीडाक्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष भरत शेटे यांनी कित्ते भंडारी संस्थेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शेटे यांच्या वतीने हा सत्कार त्यांचे बंधू सतीश शेटे यांनी स्वीकारला. दहावीच्या परीक्षेचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुहागर तालुका पत्रकार संघाला आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मयुरेश पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक कांबळे म्हणाले, आजच्या गुन्ह्यांमधील सर्वाधिक गुन्हे हुशार लोकांकडून होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशाची हवा डोक्यात शिरू देऊ नये. कार्यक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत प्रत्येक शाखेत समाजात प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना भेटवस्तूबरोबर काही रक्कमही प्रोत्साहन म्हणून देण्यात आली. भेटवस्तू तसेच आर्थिक बक्षिसे आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या खर्चासाठी शेटे, सुर्वे यांच्यासह अन्य मंडळींनी संस्थेला आर्थिक मदत केली. या वेळी माजी अध्यक्ष सायबाशेठ बागकर, मुरलीधर बागकर, मानसी शेटे, नेत्रा ठाकूर, जयदेव मोरे, दीपक कनगुटकर, श्रीधर बागकर, नवनीत ठाकूर, नीलेश मोरे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82934 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..