रत्नागिरी- सामूहिक प्रयत्नांतून जुळ्यांना मिळाली दृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सामूहिक प्रयत्नांतून जुळ्यांना मिळाली दृष्टी
रत्नागिरी- सामूहिक प्रयत्नांतून जुळ्यांना मिळाली दृष्टी

रत्नागिरी- सामूहिक प्रयत्नांतून जुळ्यांना मिळाली दृष्टी

sakal_logo
By

डोळे चित्र वापरा
....
सामूहिक प्रयत्नांतून जुळ्यांना मिळाली दृष्टी

सातव्या महिन्यात जन्म; ग्रामीण भागातील दाम्पत्याला आशेचा किरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः सातव्या महिन्यात बाळांचा जन्म झाला की, जास्त काळजी घ्यावी लागते. अवयवांची पुरेशी वाढ झालेली नसल्याने त्यांच्यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. अशाच दोन बाळांच्या दृष्टीला उद्भवलेली समस्या दूर करण्यासाठी इन्फिगो आय केअर, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाच्या एकत्रित प्रयत्नांतून यशस्वी उपचार करण्यात आले. दोन्ही बाळांच्या दृष्टीसाठी इन्फिगोच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगर (ता. राजापूर) येथील एका महिलेची प्रसूती नवव्या महिन्याऐवजी सातव्या महिन्यात रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात झाली. त्यांना जुळे झाले. इन्फिगो आय केअरमध्ये या बाळांच्या दृष्टीची तपासणी करण्यात आली; परंतु यात त्यांच्या दृष्टीला अडथळा जाणवला. डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष आढळला; परंतु त्यावरील मोफत उपचार करण्याची सुविधा कोल्हापूर येथे असल्यामुळे पालकांनी एका बाळाला कोल्हापूरला नेले. तेथे दहा हजार रुपये किमतीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर बाळाला रत्नागिरीत आणले; परंतु या बाळाला अधिक औषधोपचारांची गरज असल्याचे निदर्शनास आले.
ही गोष्ट इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पुढील उपचारांसाठी येणारा खर्च करूया, अशी तयारी दर्शवली, तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिल्या. यानंतर या बाळांवर इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. कंपन्यांचा सीएसआर फंड असतो; पण समस्या लगेच कळल्यास रुग्णावर वेळीच उपचार करता येऊ शकतात. सामूहिक प्रयत्नांतून या बाळांना दृष्टी मिळाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82936 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top