संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

--------------

गव्हे शाळेत हर घर तिरंगाबाबत सभा

दाभोळ ः दापोली तालुक्यातील गव्हे शाळेत सभा झाली. सभेत उपस्थित पालकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा या विषयीचे मार्गदर्शन पदवीधर शिक्षक चंद्रकांत उजाळ यांनी केले. याच उपक्रमांतर्गत सीमेवरील जवानांसाठी शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या (कै.) कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रोहन भावे व वैद्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. मुख्याध्यापिका सपना आयरे यांनी सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सभा अध्यक्ष लक्ष्मण गुरव व सर्व पालकांचे आभार मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक बुरूड, श्रद्धा मोहिते, रंजना गिम्हवणेकर यांनी सहकार्य केले.
-----------------

फोटो ओळी
-rat1p35.jpg- दापोली ः शेतकऱ्यांसह उपस्थित विद्यार्थी.
-----------

दापोलीत शेततळ्याबाबत मार्गदर्शन

दाभोळ ः दापोली कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी पुष्कर कुलकर्णी, साहिल जगदाळे, गौरेश चव्हाण, ताहुरा मणियार, संस्कृती पवार यांनी मौजे दापोलीत शेततळे तयार करण्यासाठी सरकारी अनुदान या विषयांवर माहिती दिली. तसेच शेततळ्याचे फायदे आणि उपयुक्तता समजावून सांगितली.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82949 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top