क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

गावतळे येथून ३० लिटर दारु जप्त
दाभोळ ः दापोली तालुक्यातील गावतळे येथे दापोली पोलिसांनी छापा मारून गावठी दारू जप्त केली असून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली पोलिसांच्या पथकाने गावतळे येथे रविवारी (ता. ३१) दुपारी सव्वाच्या सुमारास मारलेल्या छाप्यात संशयित विठोबा तुकाराम पवार (वय ५९, रा. गावतळे) याने विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवली होती. त्याच्याकडून १ हजार ६०० रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू जप्त केली. त्याच्या विरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल गावडे करत आहेत.
-------
कोकणकन्यामध्ये मोबाईलची चोरी
खेड ः कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस या गाडीतून प्रवाशाचा किमती मोबाईल चोरीस गेला. या प्रकरणी खेडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश सदानंद भिलारे (वय २८, रा. चाकाळे -शिवाजीनगर, खेड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २९ जूलैला पहाटे चार सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश एकनाथ मस्तेकर (वय ३०,रा. केळवली -इंगळेवाडी, ता. राजापूर,जि. रत्नागिरी) हे कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वेस्थानकाच्या अलिकडे गाडी आली असता संशयित रमेश भिलारे याने दिनेश याच्या बाजूला ठेवलेला २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. दिनेश मस्तेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली. संशयिताकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82966 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..