राजापूर ः मृत्यूनंतर विधवा प्रथेपासून पत्नी मुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः मृत्यूनंतर विधवा प्रथेपासून पत्नी मुक्त
राजापूर ः मृत्यूनंतर विधवा प्रथेपासून पत्नी मुक्त

राजापूर ः मृत्यूनंतर विधवा प्रथेपासून पत्नी मुक्त

sakal_logo
By

rat1p23.jpg
39964
राजापूरः निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना प्रतिज्ञापत्र देताना बी. के. गोंडाळ. या वेळी उपस्थित वात्सल्यमंदिरचे प्रमुख डॉ. महेंद्र मोहन, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मोहरकर आदी.
-------------
विधवा प्रथेपासून पत्नीच्या
मुक्तीसाठी दिले प्रतिज्ञापत्र
राजापूर, ता. १ ः पतीच्या मृत्यूपश्‍चात अंत्यविधीच्यावेळी मरण पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढणे यांसारख्या प्रथांमुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणि आनंदी जगण्यावर गदा येते. त्यामुळे अशा प्रथा पूर्णपणे बंद आणि कालबाह्य होण्याच्या उद्देशाने आपल्या मृत्यूपश्‍चात आपल्या पत्नीला अशा रूढी-परंपरेपासून मुक्त करत असल्याची भूमिका तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक भानू गोंडाळ यांनी स्पष्ट केली. याबाबतचे प्रतिज्ञापत्र त्यांनी येथील तहसीलदारांसमक्ष तयार केले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी आपल्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, हातावरील बांगड्या, फोडणे, पायातील जोडवी काढणे ही अनिष्ट प्रथा करू नये, असे त्यांनी त्यामध्ये नमूद केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82967 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top