देशाच्या सुरक्षेसमोर लालफितीचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाच्या सुरक्षेसमोर लालफितीचे आव्हान
देशाच्या सुरक्षेसमोर लालफितीचे आव्हान

देशाच्या सुरक्षेसमोर लालफितीचे आव्हान

sakal_logo
By

40091
कोल्हापूर ः ‘सकाळ’च्या ४२ व्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा सोमवारी येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात वाचकांच्या उदंड प्रतिसादात झाला. या वेळी बोलताना माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

देशाच्या सुरक्षेसमोर लालफितीचे आव्हान
---
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे; शुभेच्छांच्या वर्षावात ‘सकाळ-कोल्हापूर’चा वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः देश सुरक्षित हवा असेल तर सर्वच बाबतीत आत्मनिर्भर झाले पाहिजे. संरक्षण सिद्धतेसाठी खर्च होणारा पैसा म्हणजे विकासासाठी केलेली गुंतवणूक आहे. त्यामुळे देशाचे सैन्य, अर्थव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणा सक्षम होण्यासाठीच्या उपाययोजना लालफितीत अडकता कामा नयेत. देशाच्या सुरक्षेसमोर या लालफितीचेच आव्हान असल्याचे स्पष्ट मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज येथे व्यक्त केले.
‘सकाळ-कोल्हापूर’च्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज सोहळ्यास अध्यक्षस्थानी होते. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनरल मनोज नरवणे यांनी ‘भारतासमोरील सुरक्षिततेची आव्हाने आणि संधी’ या विषयावर संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समानता, विकासाच्या समान संधी या मूल्यांची प्राधान्याने जोपासना करणारी व्यवस्था असणारा भाग म्हणजे देश. त्याला भौगोलिक सीमा असतात. त्यात राहणाऱ्या नागरिकांना शांतता हवी असते. ही शांतता असेल तरच प्रत्येकाला आपल्या विकासाची संधी मिळते. म्हणूनच देशाच्या संरक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.’’
‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘समाजात सकारात्मकतेची बीजे रुजली जावीत आणि त्यातून विधायकतेला बळ मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने अनेक नव्या संकल्पना पुढे आणल्या आणि यशस्वी केल्या. कोरोनाच्या महाभयानक संकटानंतर ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या वर्धापन दिनाचा हा जाहीर सोहळा आणि त्याला झालेली उदंड गर्दी हे ‘सकाळ'' आणि वाचकांचे नाते किती घट्ट आहे, याची प्रचीती देणारा आहे. जागल्याची भूमिका घेऊन कार्यरत असताना सत्याशी, समाजाशी आणि वाचकांशी बांधिलकी हेच ‘सकाळ माध्यम समूहा’ने जीवनमूल्य मानले आहे.’’
दरम्यान, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप झाला. मुख्य सोहळ्यानंतर झालेल्या स्नेहमेळाव्यालाही वाचकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.

यांचा झाला गौरव
विधवा प्रथा बंद करून राज्याला आदर्श देणारी हेरवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायत, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गोशाळा उभारणारे नीतेश ओझा, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देणारे सेवा रुग्णालय, बालनाट्य शिबिरातून सजग युवा पिढीसाठी प्रयत्नशील ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर, आपत्कालीन आरोग्य सेवेत सक्रिय मुस्लिम मेडिको ॲण्ड पॅरामेडिको असोसिएशन, दि कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ इंडियाचे आशिष घेवडे, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव, पर्यावरणपूरक इडीबल कटलरी कप निर्मिती करणारे दिग्विजय गायकवाड आणि सहकारी, सेवा निलयम संस्थेच्या ऐश्वर्या मुनीश्वर यांचा माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

‘सकाळ’चा गौरव!
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूहा’ने विविध रचनात्मक कामांचाही आदर्श दिला आहे. समाजाच्या भल्यासाठी ठोस भूमिका घेणारा हा समूह असून, ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‍गार जनरल मनोज नरवणे यांनी काढले. ‘सकाळ-कोल्हापूर''च्या ४२ व्या वर्धापन दिनी संवाद साधत असताना माझी लष्करी सेवा ४२ वर्षांचीच झाली असल्याचा योगायोगही जुळून आल्याचे ते म्हणाले.

जनरल नरवणे म्हणाले...
- संरक्षणावरील खर्च म्हणजे देशाच्या सुरक्षिततेसाठीची गुंतवणूक
- विविधता हीच देशाची खरी ताकद
- शेजारील राष्ट्रांच्या स्थैर्यात भारताची भूमिका निर्णायक
- युवा पिढीवरच देशाच्या सुरक्षिततेची मुख्य जबाबदारी
- संरक्षण यंत्रणा अत्याधुनिक व नित्य सज्ज असणे आवश्यक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82981 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..