सणासुदीतच महागाईच्या झळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीतच महागाईच्या झळा
सणासुदीतच महागाईच्या झळा

सणासुदीतच महागाईच्या झळा

sakal_logo
By

सणासुदीतच महागाईचा भस्मासूर

गृहिणी संतप्त; आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २ ः गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आता तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीचा भडका उडू लागला आणि पुन्हा एकदा पंधरा रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. त्यातच पालेभाज्या आणि कडधान्याच्या किमती जीएसटीमुळे वाढू लागल्या आहेत. परिणामी यंदा श्रावण सोहळा आणि गणेशोत्सवात गृहिणींचे बजेट अक्षरशा कोलमडण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने कडधान्याच्या किमतीवर जीएसटी लागू केल्यापासून महागाई वाढली आहे. दोन वर्षांतील कोरोनाच्या कालखंडात आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला ग्राहक महागाईच्या विळख्यात अजूनही गुरफटलेलाच आहे. गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०६७ आहे. शहरी भागात मिळणारा हा सिलेंडर ग्रामीण भागात घरपोच होईपर्यंत त्याची किंमत १५०० रूपयांच्या आसपास जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींना पूर्वीप्रमाणे पारंपरिक इंधनाचा वापर करण्याची वेळ आली आहे. धुरमुक्तीची स्वप्ने दाखवून केंद्र शासनाने सिलेंडर घेण्यासाठी विविध योजना आखल्या; पण त्याचा म्हणावा तसा योग्य पुरवठा होत नाही. या योजनेपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांना मात्र, विनाअनुदानितच स्वयंपाक गॅस सिलेंडर खरेदी करावा लागत आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आता नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, दहीहंडी आणि गणेशोत्सव असे विविध धार्मिक सण जवळ आले आहेत. मुसळधार पावसामुळे भाजीपाला आणि शेतीचे नुकसान झाले. परिणामी परजिल्ह्यातून येणारा भाजीपाला महागला आहे. याचा थेट परिणाम आगामी सणांवर उमटणार आहे. गॅस सिलेंडरसह कडधान्याच्या किमतीही वाढल्या आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, अशी स्थिती असून कुटुंबांचे बजेट कोलमडून पडू लागले आहे.
--
40278
स्नेहा महाडिक

रेशनवर जगण्याची वेळ
केंद्र आणि राज्य सरकारने विविध प्रकारचे कर वाढवल्यामुळे गृहिणीला कुंटुंब चालवणे अवघड बनले आहे. रेशनवर जगण्याची वेळ आली आहे. बँकांच्या कर्जाच्या विळखा आहे. बेरोजगारी वाढली असून मुलांना नोकऱ्या नाहीत. गावातील मुलींना शहरातील चार-पाच हजारावर काम मिळते, पण महागाईच्या तुलनेत ते वेतन तोकडे आहे. रेशनवर किमान जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात मिळाल्या तर अधिक बरं होईल. यातून दोन वेळेचे अन्न तरी मिळेल, अशी प्रतिक्रिया हुंबरठ (ता.कणकवली) येथील गृहिणी स्नेहा महाडिक यांनी दिली.
-------------------
40279
सानिका तारळेकर

कष्टकरी महिला अडचणीत
कष्टकरी महिलांना नेहमीच्या रोजगारावर आपलं कुंटुंब चालवावे लागते. मोल मजुरीवर त्यांची रोजीरोटी चालते; पण वाढत्या महागाईने कष्टकरी महिलांचे बजेट कोलमडत आहे, अशी खंत सानिका तारळेकर यांनी व्यक्त केली. सिंलिंडरच्या किंमती दर महिण्याला वाढत आहेत. इतरही वस्तूं महाग होत आहेत. त्यातुलनेत कष्टकरी महिलांच्या मासिक उत्पन्नात वाढ होत नाही. येणारा पैसा अधिक खर्च होत आहे. परिणामी बचत होत नाही. सरकारने महागाईवर नियंत्रण आणावे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83097 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..