
''एनसीसी'' सैन्यदलाची पहिली पायरी
L४०२११
ओळ - सिंधुदुर्गनगरी ः येथे आयोजित कार्यक्रमात तहसीलदार अजय पाटणे यांचा सत्कार करण्यात आला.
''एनसीसी'' सैन्यदलाची पहिली पायरी
अजय पाटणे ः सिंधुदुर्गनगरीत थलसेना, सीएटीसी कॅम्पची सांगता
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ ः देशाचे संरक्षण करण्यासाठी भूदल, वायुदल, नौदल अशा तीन सेना कार्यरत आहेत. सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या युवकांमध्ये शिस्त असणे आवश्यक आहे. आयुष्य जगताना शिस्त गरजेची आहे. सैन्यात जाण्यासाठी एनसीसी ही पहिल्या पायरीसमान असून, विद्यार्थ्यांनी एनसीसीमधून आपल्या अंगी शिस्त बाणवावी, असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी ओरोस येथे केले.
ओरोस येथे ५८ महाराष्ट्र बटालियन आणि एनसीसी यांच्यातर्फे गेले महिनाभर सुरू असलेल्या भारतीय थलसेना कॅम्प व सीएटीसी कॅम्पची सांगता शनिवारी झाली. ५८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल दीपक दयाळ (कमांडिंग ऑफिसर), सुभेदार मेजर गेडाम यांच्या सोबत ए.एन.ओ कॅप्टन आवटे, ए.एन.ओ. ढेरे, नंदकर, शेळके व इतर पीआई स्टाफ उपस्थित होता. ॲडमिरल ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर देवेंद्र सिंह, सुभेदार मेजर तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्र केस, सुभेदार जितेंद्र तिवारी, बी. एच. एम. सुरजीतसिंग (इस्ट्रक्टर), सुभेदार आर. एन. भांजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प घेण्यात आला. राज्यातील १२०० मुलगे व मुली कॅडेट या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना फायरिंग, ड्रिल, ऑप्टिकल, मॅप रीडिंग, पॉईंट टू पॉईंट, ग्राऊंड टू मॅप, मॅप टू ग्राऊंड, स्वयंसरक्षण, निरोगी आरोग्य, स्वच्छता, सामाजिक भान, समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन, योगा, युद्ध प्रशिक्षण अशा अनेक बाबतीत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
व्यासपीठावर कर्नल दीपक दयाळ, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, तहसीलदार अजय पाटणे, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, उपशिक्षणाधिकारी रोमराज शेर्लेकर, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तलाठी दिलीप ठाकूर, तलाठी वसंत राठोड, लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत, श्री. कुंभार आदी उपस्थित होते.
कर्नल दयाळ प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एस. आर. एम. कुडाळ, एस. पी.के. सावंतवाडी, वेंगुर्ले कॉलेज, देवगड कॉलेजच्या एनसीसी कडेट्ससह इतर जिल्ह्यातील थलसेना, एनसीसी कॅडेट्स यांनी सांस्कृतिक व लोक नृत्य, गायन तसेच देशभक्तिपर गाण्यांवर नृत्ये सादर केली. सूत्रसंचालन भावेश नाईकधुरे व अनुष्का राणे यांनी केले.
....................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83141 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..