रत्नागिरी- अध्ययन अक्षम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- अध्ययन अक्षम
रत्नागिरी- अध्ययन अक्षम

रत्नागिरी- अध्ययन अक्षम

sakal_logo
By

rat२p१५.jpg
L४०१६७
रत्नागिरीः पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. संघमित्रा फुले.
...........
अध्ययन अक्षम केंद्र बनतेय सक्षम

डॉ. फुले; लेखन, वाचन, गणित अक्षमता असल्यास विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः अध्ययन अक्षम विद्यार्थी शोधणे, त्यांच्या चाचण्या करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे कार्य जिल्हा रूग्णालयातील अध्ययन अक्षम विभाग गेली पाच वर्षे करत आहे. साधारण जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या संख्येच्या प्रमाणात अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण १० टक्के मानले जाते. त्या दृष्टीने या विभागाला मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. सुरवातीला चाचण्यांसाठी कीट विकत घेणे, शिक्षकांना प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी करत आज हा विभाग सक्षम बनत आहे. तिसरी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चाचणी केली जाते. लेखन, वाचन, गणित यापैकी एक किंवा सर्व क्षेत्रात अक्षमता असल्यास प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेच्या विद्यमाने २०१६ मध्ये अध्ययन अक्षम विभाग सुरू करण्यात आला. या विभागाच्या कामकाजाविषयी आज पत्रकार परिषदे डॉ. फुले यांनी माहिती दिली. तिसरी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणींचा शोध घेणे व त्यांचे शास्त्रीय मूल्यमापन करणे, निदान करणे व त्यांना प्रमाणपत्र देणे हे काम या केंद्रातर्फे केले जाते.
प्रमाणपत्रानंतर विविध शासकीय योजना, सवलती, शाळा, महाविद्यालयीन स्तरावर देण्याबाबत विद्यार्थी पालक शिक्षक व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले जाते. गरजेनुसार समुपदेशनही केले जाते. कोरोनाच्या आधी २०२० पूर्वी जिल्ह्यातील ४८६ आणि सप्टेंबर २०२१ पासून आजपर्यंत ११३ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४१ विद्यार्थ्यांना अध्ययन अक्षमचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे डॉ. फुले म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचे मार्गदर्शन या केंद्राला मिळते. या केंद्राचे नोडल अधिकारी म्हणून डाएटचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील काम पाहतात. डायट, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मानसोपचारतज्ञ सचिन सारोळकर, विभागप्रमुख डॉ. नितीन चौके आदी उपस्थित होते.
------------------------------
चौकट १
आठजणांची टीम
या केंद्रामध्ये आठ तज्ञांची टीम काम करते. यात मनोविकृती तज्ञ, बालरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, नेत्ररोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ यांचा समावेश आहे. एका विद्यार्थ्याच्या तपासणीसाठी दोन-अडीच तास लागतात. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याच शाळा, महाविद्यालयात शिक्षण सुरू ठेवले जाते. त्यामुळे विद्यार्थी वेळेत येण्याकरिता शिक्षक, पालकांनी जागरुक राहिले पाहिजे, असे डॉ. फुले म्हणाल्या.
-----------------------
चौकट २
राज्यात कौतुक
मागील चार वर्षाच्या वाटचालीचे पुस्तक केंद्रातर्फे प्रकाशित केले आहे. राज्यस्तरावर या पुस्तकाचे भरभरून कौतुक करण्यात आले. अधिकाधिक अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा. पालक, शिक्षक व व्यावसायिकांनी त्याबाबत विद्यार्थ्यांना केंद्रात आणून त्यांची तपासणी करणे, आवश्यकतेप्रमाणे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. फुले यांनी केले.
..
ग्राफ करावा
एक नजर...
२०२० पूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची तपासणीः ४८६
सप्टेंबर २०२१ पासून तपासणीः ११३
त्यातील अध्ययन अक्षमचे प्रमाणपत्र दिलेः ४१

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83146 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top