
रत्नागिरी- वैद्यकीय महाविद्यालय
40224 ः संग्रहीत
...................
वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू होणार
डॉ. फुले; १०० विद्यार्थ्यांना प्रवेश, एमसीआयची समिती येणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः पुढील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते. नुकतीच एका समितीने जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आणि महिला रुग्णालयाची पाहणी केली आहे. आता मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची (एमसीआय) समिती पाहणी करण्यास येईल. साधारण १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
महाविद्यालयाविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जिल्हा रुग्णालयात २००, महिला रुग्णालयात १०० आणि प्रादेशिक मनोरुग्णालयात ३५० बेडची क्षमता आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व निकष आम्ही पूर्ण करत आहोत. महाविद्यालय सुरू झाल्यास येथेच डॉक्टर उपलब्ध होतील. रत्नागिरीचा विचार करता खासगी डॉक्टर्स, रुग्णालयांची संख्यासुद्धा वाढत आहे. तरीही जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या कमी नाही.
जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, फिजिशियन प्रत्येकी एक उपलब्ध आहेत. तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहेत; परंतु उपलब्ध कर्मचारी तितक्याच ताकदीने रुग्णालयाचे कामकाज चालवत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर येथे उपचार होत आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी उपकरणे घेण्यासाठी प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निधी मंजूर होणार आहे. त्यामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढेल. तसेच कामथे, दापोली येथे अतिदक्षता विभाग वर्षअखेरीपर्यंत सुरू करण्याचा मानस आहे. त्याकरिता प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती डॉ. फुले यांनी दिली.
महिला रुग्णालयाच्या शेजारी आयुष रुग्णालय पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सातबारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नावावर करण्यासंदर्भाने प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे डॉ. फुले म्हणाल्या. मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने येथेसुद्धा तपासणी सुरू केली आहे. मंकीपॉक्सचा एकही रुग्ण रत्नागिरीमध्ये नाही. कोरोनाची चौथी लाट सुरू असल्याने टेस्टिंग वाढवल्याचेही त्यांनी सांगितले.
......
चौकट
दिव्यांगांचे ७६ प्रस्ताव प्रलंबित
डॉ. फुले यांनी सांगितले की, मी पदभार स्वीकारला, तेव्हा सुमारे १५०० दिव्यांगांचे प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव प्रलंबित होते; परंतु आज फक्त ७६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१८ पासून आजपर्यंत रुग्णालयाकडे १६ हजार ७२४ अर्ज आले व त्यातील १३ हजार ८८१ दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले. २७६७ जणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. सर्व तालुक्यांत दिव्यांगासाठी शिबिरे होत आहेत. दर बुधवार व शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात तपासणी केली जाते. मे अखेरची वैद्यकीय बिलेसुद्धा पूर्ण दिली असून आता फक्त जून-जुलै महिन्यातील बिले प्रलंबित आहेत.
...
ग्राफ करावा
चौकट
दिव्यांगांचे प्रमाणपत्र प्रस्तावावर एक दृष्टिक्षेप...
२०१८ पासून आजपर्यंत अर्ज आले*१६ हजार ७२४
त्यातील दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले*१३ हजार ८८१
प्रस्ताव फेटाळले*२ हजार ७६७
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83147 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..