चिपळूण ः इको सेन्सिटिव्ह झोन गावासाठी अधिसूचना जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः इको सेन्सिटिव्ह झोन गावासाठी अधिसूचना जारी
चिपळूण ः इको सेन्सिटिव्ह झोन गावासाठी अधिसूचना जारी

चिपळूण ः इको सेन्सिटिव्ह झोन गावासाठी अधिसूचना जारी

sakal_logo
By

40242
......................

इको सेन्सिटिव्ह संदर्भात अधिसूचना
५ तालुक्यातील २९१ गावे झोनच्या अहवालात ; बांधकामासह, खाण प्रकल्पांवर बंदी
चिपळूण, ता. २ ः केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने इकोसेन्सिटिव्ह संदर्भात अधिसूचना काढली आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातील एकूण २९१ गावे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील लोकांना बांधकाम, खाणसंदर्भातील प्रकल्पांवरही बंदी येणार आहे. त्याशिवाय २० हजार स्क्वेअर फुटापेक्षा अधिक बांधकामांना मनाई करण्यात येणार आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे, रिक्टोली, बामणोली, पेढे परशुराम, तिवडी, कादवड, नांदिवसे, मोरवणे, स्वयंदेव, खोपड, गणेशपूर, कळकवणे, गाणे, ओवळी, पेढांबे, कोळकेवाडी, अडरे, कामथेखुर्द, टेरव बु., मुंढेतर्फ चिपळूण, खरवते, अनारी, उभळे, शिरगाव, कुंभाली, कोंडमळा, कोंडफणसवणे, तळसर, पोफळी, कुडप, पोफळी बु., डेरवण, तुरंबव, मुंढेतर्फ सावर्डा, ढाकमोली, फुरुस, दुर्गवाडी खुर्द, दुर्गवाडी, मंजुत्री, तळवडे, पाथे, मजरेगोवळ, कुटरे या गावांचा समावेश आहे.
खेड तालुक्यातील तूळशी बु., तुळशीखुर्द, वडगाव बुद्रुक, शिवतर, कळंबणी खुर्द, कसबा, नातू, पाखरवाडी, दहीवली, वाडी बेलदार, दिवाणखवटी, वडगाव खुर्द, किंजळेतर्फ नातू, बिरामणी, कोंडवाडी, घेरापालगड, शिंगरी, पुरेखुर्द, जामगे, घेरा सुमारगड, कांदोशी, विहळी, किंजळेतर्फ खेड, नांदिवली, कळंबणी बु., वाडी मालदे, पोयनार खुर्द, साखरोळी खुर्द, तिसे खुर्द, अस्तान, घेरा रसाळगड, वाडीबीड, चाटव, प्रभूवाडी, देवघर, हुंबरी, खालची (हुंबरी), सनाघर, कर्टेल, चिंचवाडी, वरोवली, आंबवली, नवानगर, कुंभाड, नांदगाव, संगलट, शिरगाव, खोपी, निवे, बजरंगनगर, मोरवंडे खुर्द, चोरवणे, शिरगाव खुर्द, मिर्ले, शिव खुर्द, तळवट खेड, सापिर्ली, तळवट जावळी, चोरवणे उतेकरवाडी, तळवट पाल, कवळे, कासई, अष्टीमोहल्ला, साखर, भेलसई बुधवाडी, धामणंद, भेलसई चौथाई, वावे चिंचवाडी, धामणंद गावठाण, केळणे, जावळी गावठाण, झगडेवाडी, कुंभवली, कुरवळ गावठाण, आंबडस या गावांचा समावेश आहे लांजा तालुक्यातील वेसुर्ले, शिरंबवली, कोचरी, डाफळे, सालपे, कुरचुंब, माचाळ, चाफेट, कांगवली, वेरळ, चिंचुर्टी, खोरनिनको, पालू, आगरगाव, हसोळ, कुंभारगाव, प्रभानवल्ली, गुरववाडी, खानवली, वाघ्रट, कांटे, बुद्धवाडी वेरवली बु., माजळ, रामगाव, इसवली, जावडे, भांबेड, पूरगाव, कुडेवाडी, भडे, हर्दखळे, बापेरे, निवोशी, पुरंग, वाकेड, कोंडगे, पनोरे, विलवडे, रुण, आरगाव, खोरगाव, बोरथडे, हर्चे, कोंडगाव, रिंगणे या गावांचा समावेश आहे.

चौकट
हरकती नोंदविण्याचे आवाहन
इकोसेन्सिटिव्हसंदर्भातील हरकती ६० दिवसात नोंदवणे आवश्यक आहेत. या संदर्भात तक्रार असल्यास ग्रामपंचायतींनी हरकत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83154 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top