
मागासवर्गीयांनाही ओटी, गाऱ्हाणे घालता येणार
मागासवर्गीयांनाही ओटी,
गाऱ्हाणे घालता येणार
नरडवे मंदिरातील प्रकरण निकाली
कणकवली, ता. २ : नरडवे (ता.कणकवली) येथील आई अंबादेवी व आई विठ्ठलादेवी मंदिरात इतर समाजाप्रमाणेच मागासवर्गीय समाजाची ओटी भरणे व गाऱ्हाणे सांगणे विधी केले जाणार आहेत. नरडवे पायरवाडी येथील रहिवाशांची ही मागणी गावचे देवस्थान प्रमुख, गुरव, घाडीगावकर तसेच सरपंच अमिता सावंत यांनी मान्य केली. डॉ. सतीश पवार यांनी आज ही माहिती दिली.
डॉ.पवार म्हणाले, नरडवेतील आई अंबादेवी व विठ्ठलादेवी मंदिरात मागासवर्गीय समाजाला अपमानास्पद वागणूक दिली जाते. या समाजातील नागरिकांची ओटी भरताना पुजारी अन्य ठिकाणी ओटी भरतात. तसेच गाऱ्हाणेही वेगळ्या ठिकाणी घातले जाते. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान, ‘‘श्री. खंडागळे यांनी तसे पत्रही दिले असून देवस्थान प्रमुख, सरपंच तसेच पोलिस प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेबाबत समाधानी आहोत. तसेच लवकरच देवाचे निशाण आणि मागासवर्गीय समाजाचा मानकरी मंदिरात घ्यावा या मागणीचासुद्धा शांततापूर्ण मार्गाने पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. आमच्या या लढ्याला पाठिंबा देणारे कायदेतज्ज्ञ विलास परब, चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष सुजित जाधव आदींचे आभार मानत आहोत, असेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83157 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..