
''आरपीडी''चे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिशादर्शक ठरेल
L४०२८७
ओळ - सावंतवाडी ः प्रा. एस. जी. ढोणुकसे यांचे स्वागत करताना प्रा. रमा घोरपडे-सावंत. बाजूला प्राचार्य धोंड, सुरेश लांबोरे.
''आरपीडी''चे स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन दिशादर्शक ठरेल
एस. जी. ढोणुकसे ः सावंतवाडीत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः जिल्ह्यातील मुलांकडे उत्तम टॅलेंट असूनही प्रशासकीय सेवेतील जिल्ह्याचा टक्का अजूनही कमीच आहे. याचे कारण म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांना मिळत नसलेले स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन. त्यामुळे राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भविष्यातील सिंधुदुर्गासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमीचे प्रा. एस. जी. ढोणुकसे यांनी केले.
येथील राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये प्रा. ढोणुकसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य धोंड, उपप्राचार्य सुमेधा नाईक, प्रा. परब, प्रा. सौ रमा घोरपडे, प्रा. माने, प्रा. कांबळे, प्रा. म्हसकर, प्रा. पाथरवट, अकॅडमी क्रीडा कोचचे नामदेव जंगले, सिद्धांत डांगी, सुरेश लांबोरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. ढोणुकसे यांनी स्पर्धा परीक्षेचे व प्रशासकीय सेवेचे महत्त्व अधोरेखित करीत प्रशासकीय सेवा हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले. करिअर, चांगली नोकरी, मानसन्मान, प्रतिष्ठा मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा एक उत्तम मार्ग असल्याचे सांगितले. पोलीस, सैन्य, एमपीएससी, सरळ सेवा आदी विविध परीक्षेतील संधी, अभ्यास पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
-----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83215 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..