संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat१p२६.jpg
४०००२
खेड ः तालुक्यातील तळे येथे आयोजित हर घर तिरंगा अभियान यशस्वीतेसाठी आयोजित सभेला उपस्थित ग्रामस्थ.
........
हर घर तिरंगा जागृती पालक सभा
खेड ः हर घर तिरंगा उपक्रमाची जाणीवजागृती करण्यासाठी तळे विभाग सेकंडरी स्कूल, तळे विद्यालयामध्ये नुकतेच पालकसभेचे आयोजन सरपंच शामराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या सभेत तळे गावचे उपसरपंच भरत महाडीक, ग्रामसेवक क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष व संस्था सदस्य प्रभाकर जाधव, कुडोशी गावच्या सरपंच फागे, तळे विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट जगताप, विद्यालयाचे सर्व कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, आरोग्यविभाग, माजी सैनिक प्रकाश मोरे, विविध विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ व विविध शालेय समित्यांचे प्रमुख व पालकवर्गाची उपस्थिती होती. या सभेमध्ये या उपक्रमासंबंधित सूत्रसंचालन व शासकीय परिपत्रकांचे वाचन नाकती यांनी केले. ध्वजसंहितेचे वाचन करून सर्वांना संहिता वाटप करून हर घर तिरंगा उपक्रमाबद्दल जनजागृती करण्यात आली. प्रशांत पंदेरे यांनी आभार मानले.
---
फोटो rat१p२७.jpg
40003
खेड ः तालुक्यातील बिजघर पंचक्रोशीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना नरेंद्र महाराज संस्थेचे सदस्य.
---
तिसंगी येथे शैक्षणिक साहित्य वाटप
खेड ः तालुक्यातील तिसंगी येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानाच्या सेवाकेंद्र बिजगर-तिसंगी यांच्या प्रयत्नाने पंचक्रोशीतील ४ जि. प . शाळा व अंगणवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्य संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच भोसले, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तसेच तिसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. संस्थानाचे पदाधिकारी दत्तात्रय मोरे, श्री क्षेत्र नाणीज तालुका सेवाअध्यक्ष यद्रे, दगडू नेवरे, मधुकर डाऊल, विजय भोसले, खापरे, सुनील लाड आदी उपस्थित होते.
---
फोटो rat१p२८.jpg
40004
ः खेड ः ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी तालुक्यातील मोरवंडे येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थी.
---
ज्ञानदीप स्कूलचे स्पर्धेत यश
खेड ः तालुक्यातील मोरवंडे येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे-शालेय प्रसार परीक्षा विभाग, लोकमान्य टिळक पुण्यतिथी मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्ताने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ज्ञानदीपच्या विद्यार्थी व शिक्षकांनी यश मिळवले आहे. स्पर्धेत गट २ (७ वी ते ८ वीमधून) उत्तेजनार्थ-वेदांग भावे, ७ वी, गट ३ (९ वी ते १० वीमधून) द्वितीय क्र. प्राची पालवनकर (१० वी), शिक्षकगटातून द्वितीय कमांक विनायक सुर्वे यांनी मिळवला आहे. संस्थेचे पदाधिकारी, सर्व विभागांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
---
फोटो rat१p२९.jpg
40005
खेड ः तालुक्यातील कशेडी घाट येथील स्वामींच्या मंदिरात करण्यात आलेली दिव्यांची आरास.
---
कशेडी बंगला येथील
स्वामींच्या मठात दीपोत्सव
खेड ः रायगड व रत्नागिरीच्या सीमेवर असणाऱ्या कशेडी घाट येथील स्वामींच्या मंदिरात भक्तगणांनी आषाढ अमावस्येदिनी दिव्याची आरास करत दीप लावत संपूर्ण मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला. आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीपपूजा अमावस्या म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मियांसाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक असल्याने या महिन्याच विशेष आकर्षण असतं. मग या महिन्याच्या आदल्या दिवशी दीपपूजा करून नव्या महिन्याच्या स्वागताला तयार व्हा. तिमिराकडून तेजाकडे नेणारा दिवा हा आपल्या संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. यालाच अनुसरून आषाढ अमावस्येला कशेडी बंगला स्वामींच्या मठात दीपपूजा अमावस्या साजरी केली गेली. यावेळी दिव्यांची पूजा करत संपूर्ण मंदिर दिव्यांनी उजळून निघाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83250 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top