अमृत महोत्सव वर्षात ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृत महोत्सव वर्षात ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची देणगी
अमृत महोत्सव वर्षात ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची देणगी

अमृत महोत्सव वर्षात ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची देणगी

sakal_logo
By

ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडेंची
डॉ. आंबेडकर वाचनालयास मदत
चिपळूण, ता. २ ः येथील ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांनी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला ११ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश प्रदान केला. वाचनालयाचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी या देणगीनिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना, आंबेडकर वाचनालयाच्या स्थापनेत आणि आजवरच्या वाटचालीत देशपांडे यांचा फार मोठा वाटा असल्याचे नमूद केले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रकाश देशपांडे यांचा सत्कार व ग्रंथतुला करण्यात आली. मानपत्र, तैलचित्र आणि १ लाख १ हजार १११ रुपयांची थैली असे या सत्काराचे स्वरूप होते. सत्कारावेळी मिळालेल्या थैलीतील रक्कम देशपांडे यांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना देणगीरूपाने देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार देशपांडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासह लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर, श्रीकृष्ण व्याख्यानमाला चिपळूण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, डॉ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानचे विद्यार्थी वसतिगृह देवखेरकी या संस्थांना ही रक्कम देणगी म्हणून विभागून दिली. ही देणगी आमच्यासाठी अमूल्य आणि अनुकरणीय प्रेरणा आहे, अशी प्रतिक्रिया वाचनालयाचे सचिव सुमेध करमरकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83253 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..