
रत्नागिरी- रत्नागिरीत 8 ऑगस्टला
रत्नागिरीत ८ ऑगस्टला
सायकलफेरीचे आयोजन
रत्नागिरी, ता. ३ः घरोघरी तिरंगा (मिशन हर घर तिरंगा) अभियानाच्या जनजागृती मोहिमेसाठी येत्या रविवारी ७ ऑगस्टला सकाळी ८ वाजता जयस्तंभ येथून सायकलफेरीचे आयोजन केले आहे. जनजागृती संघ आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमार्फत याचे नियोजन केले आहे. यात जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सायकलपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
या सायकलफेरीचा मार्ग जयस्तंभ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, जेलरोड सिग्नल, जिल्हा रुग्णालय, एसटी बसस्थानक, रामआळी, पतितपावन मंदिर, जोशी पाळंद, टिळक आळी, आठवडा बाजारमार्गे पुन्हा जयस्तंभ असा आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या या फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेत उपस्थित असलेल्या पहिल्या ७५ सायकलप्रेमींना हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत घरी लावण्यासाठी तिरंगा देण्यात येणार आहे. त्याकरिता तिरंगा घरी नेण्यासाठी सॅक/पिशवी सोबत बाळगावी. तसेच सायकलपटूंनी येताना एक लिटर पाण्याची बाटली आणावी. १४ वर्षाखालील मुलांबरोबर त्यांचे पालकसुद्धा सोबत असणे गरजेचे आहे. फेरीदरम्यान पाण्याची व्यवस्था आणि फेरी संपल्यावर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83273 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..