चिपळूण ः निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची भक्तांना प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची भक्तांना प्रतीक्षा
चिपळूण ः निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची भक्तांना प्रतीक्षा

चिपळूण ः निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची भक्तांना प्रतीक्षा

sakal_logo
By

निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची भक्तांना प्रतीक्षा
सध्या संभ्रम ; मूर्तीच्या उंचीची मर्यादा किती
चिपळूण, ता. २ः दोन वर्षापासून कोरोनामुळे निर्बंध घातलेल्या देशातील सर्वात मोठा लोकोत्सव अर्थात गणेशोत्सवाचे गणेश मंडळ कार्यकर्त्यांसह भक्तांना वेध लागले आहेत. दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्सव निर्बंधमुक्त असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना अद्याप त्याबाबत शासनाकडून स्पष्ट दिशानिर्देश नसल्याने कार्यकर्त्यांसह मूर्तिकारही संभ्रमात आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला ऊर्जा देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख आहे. गेल्या दोन वर्षात हा उत्सव साजरा झाला नाही. कोरोनामुळे गर्दी जमवण्यावरच बंदी असल्यानंतर अशा प्रकारे उत्सव तरी कसे साजरे होणार, अगदी मूर्तीची उंची किती असावी मंडप कुठे व कसा असावा, किती कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, विसर्जन घरीच करावे अशा प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले होते. अशातही मर्यादित स्वरूपात सण, उत्सवाचे पावित्र्य राखत भक्तांनी आपापल्यापरीने या दोन वर्षात उत्सव साजरा केला.
यावर्षी मात्र तुलनेत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव नेहमीसारखाच जल्लोषात, भव्यदिव्य स्वरूपात साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवाला अजून अवधी असला तरी मागील दोन महिन्यापासून तयारी सुरू झाली आहे. यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असेल याचे संकेत आमदार शेखर निकम व प्रशासनाने दिले आहेत; मात्र अद्याप स्पष्ट आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे मूर्तिकारांचीही अडचण झाली आहे. मागील दोन वर्ष चार फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी, अशी गट घातली होती. यावर्षी उंचीची मर्यादा किती याबाबत अजून स्पष्ट आदेश आलेले नाही.
...........
कोट
कोरोना काळात श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवातील पावित्र्याच्या जपणुकीचा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने काही आदेश काढण्याच्या आधीच उत्सवाचे पावित्र्य राखत तो मर्यादित स्वरूपात साजरा केला. यावर्षी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने सर्वांचीच अपेक्षा हा उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्याची आहे. त्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश प्राप्त नाही. केवळ घोषणा झाली आहे. गणेशोत्सवात काय स्थिती असेल हे आता सांगता येत नाही; मात्र परिस्थितीनुसार कार्यकर्ते जबाबदारीने वागतील, यात शंका नाही.
- नित्यानंद भागवत, सदस्य श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83274 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..