प्रलय, विकास ही दोन्ही अस्त्र शिक्षकांकडे पाहिजेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलय, विकास ही दोन्ही अस्त्र शिक्षकांकडे पाहिजेत
प्रलय, विकास ही दोन्ही अस्त्र शिक्षकांकडे पाहिजेत

प्रलय, विकास ही दोन्ही अस्त्र शिक्षकांकडे पाहिजेत

sakal_logo
By

प्रलय, विकास ही दोन्ही अस्त्र
शिक्षकांकडे पाहिजेतः डॉ. भिडे
गावतळे, ता. २ः ‘‘प्रलय व विकास ही दोन्ही अस्त्र शिक्षकांकडे असली पाहिजेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रथम राष्ट्रीय मुल्य शिकवणे गरजेचे आहे, असे मत तेलंगणा विद्यापीठचे कुलपती व पुनरुत्थान विद्यापीठचे आचार्य परिषद सदस्य डॉ. शैलेश भिडे यांनी व्यक्त केले. ते दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कोकणभूमी मराठा समृद्धी प्रतिष्ठान मुंबई आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. भिडे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत उतरण्याची इच्छा आतून आली पाहिजे. यासाठी आपली दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. निव्वळ पैसे कमवण्यासाठी एमपीएससी करू नका. कारण, पैसे मिळवण्यासाठी अन्य उत्पन्नाचे मार्ग आहेत. एमपीएससी परीक्षा देण्याआधी स्वतःमध्ये राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. आपला देश परम वैभवाला कसा जाईल, याची काळजी आपणास असली पाहिजे. जगामध्ये आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. आपले प्रत्येक सण हे आध्यात्मिकतेबरोबर निसर्गाशी, विज्ञानाशी नातं सांगणारे आहे. आपला कधीही कृषिप्रधान देश नव्हता तर तो कलाकुसरीने भरलेल्या कारागिरांचा देश होता. इंग्रजांनी आपला निकृष्ट माल विकला जावा यासाठी त्यांचा छळ करून शेती करण्यास भाग पाडले. आजच्या शिक्षकाने ठरवले तर आजही अनेक मुले एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. एमपीएससी परीक्षेसाठी जाताना प्रत्येक घडामोडीवर लक्ष असणे गरजेचे आहे. त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. योग्य साधनसामग्री वापरणे. आणि एमपीएससी पास झालेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका येईल, याचा अंदाज येतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83280 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top