राजापूर ः संघटना अध्यक्षपदी राजाराम शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः संघटना अध्यक्षपदी राजाराम शिंदे
राजापूर ः संघटना अध्यक्षपदी राजाराम शिंदे

राजापूर ः संघटना अध्यक्षपदी राजाराम शिंदे

sakal_logo
By

rat२p३१.jpg
४०२४५
ः राजाराम शिंदे
..........
rat२p३२.jpg
४०२४६
ः विकास पिठलेकर
..........
rat२p३३.jpg
४०२४७
ः पाटील
..........
rat२p३४.jpg
४०२४८
ः घडशी
..........
राजापूर महसूल संघटना अध्यक्षपदी शिंदे

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुक्याची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी गोदाम व्यवस्थापक राजाराम शिंदे यांची तर सरचिटणीसपदी अव्वल कारकून विकास पिठलेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राजापूर तालुका महसूल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष मंगेश परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये २०२२-२३ या पुढील वर्षाकरिता नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कार्याध्यक्ष अव्वल कारकून घडशी, उपाध्यक्ष मंडळ अधिकारी पाटील, महिला उपाध्यक्ष महसूल अव्वल कारकून निटुरे, सरचिटणीस संजय गांधी योजना अव्वल कारकून पिठलेकर, खजिनदार महसूल सहाय्यक बिर्जे, संघटक सचिव वाहनचालक गवंडी, चिटणीस गोदाम पालक प्रभूलकर, प्रसिद्धीप्रमुख उपलेखापाल थोरात, महिला प्रतिनिधी महसूल सहाय्यक शिंगे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रतिनिधी शिपाई मोरे यांची निवड करण्यात आली आहे. महसूल कर्मचाऱ्‍यांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी शिंदे यांनी सहकाऱ्‍यांच्या साथीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. शिंदे हे २०१८ ते २०२२ या कालावधीमध्ये तालुका कार्यकारिणीवर कार्याध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्याचबरोबर सध्या ते राजापूर तालुका महसूल समन्वय समितीच्या खजिनदार पदावर कार्यरत आहेत.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83302 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..