
दाभोळ ः आंजर्ले खाडीपुलावर 15 ऑगस्टपासून आंदोलन
फोटो : rat२p४३.jpg
L40317
आंजर्ले ः येथील खाडीपुलावर पडलेले खड्डे.
......
आंजर्ले खाडीपुलावरील खड्डेभरणीसाठी
१५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २ ः सागरी महामार्गावरील प्रमुख पूल असलेल्या आंजर्ले खाडीपुलावर गेल्या २ वर्षापासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहने चालवून वाहनचालक मेटाकुटीस आले असून सार्वजनिक बांधकाम विभाग हे खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या पुलाव खड्डे बुजवून डांबरीकरणाच्या कामास ७ ऑगस्टपर्यंत सुरवात न केल्यास या पुलावर १५ ऑगस्टपासून आंदोलन केले जाईल, असा इशारा आंजर्ले येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे.
गणेशोत्सव तोंडावर आलेला असून या पुलावरून वाहनातून गणेशमूर्ती आणताना त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने या पुलावरील डांबरीकरणाच्या कामाला ७ ऑगस्टपासून सुरवात न केल्यास १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन कार्यक्रम झाल्यावर ग्रामस्थ या पुलावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षरोपण करणार आहेत. तसेच आंदोलनास सुरवात करणार असून या आंदोलनादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व वाहतूक बंद करणार आहे. त्यामुळे नागरिकांना जर त्रास झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असे पत्र आंजर्ले खाडीपूल खड्डे निवारण समितीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.
-
चौकट
आंजर्ले खाडीपुलावर पडलेले खड्डे जांभ्या चिऱ्याने भरले जाणार असून पावसाळा संपल्यावर खड्डे डांबर खडीने भरण्यात येतील.
- पटेल, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग दापोली.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83308 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..