सावंतवाडीतील चोरी प्रकरणातील संशयितास न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील चोरी प्रकरणातील संशयितास न्यायालयीन कोठडी
सावंतवाडीतील चोरी प्रकरणातील संशयितास न्यायालयीन कोठडी

सावंतवाडीतील चोरी प्रकरणातील संशयितास न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By

सावंतवाडीतील चोरी प्रकरणी
संशयितास न्यायलयीन कोठडी
सावंतवाडी, ता. २ ः शहरात घडलेल्या चोरी प्रकरणातील संशयित सचिन राजू माने याला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याआधी त्याला पहिल्यांदा ७ दिवसाची व त्यानंतर १ दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. शहरात झालेल्या आणखीन एका चोरी प्रकरणात पुन्हा त्याला ताब्यात घेणार असल्याचे उपनिरीक्षक आनंद यशवंते यांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, संशयित मानेला १६ जुलैला मालवण पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली होती. त्यानंतर २५ जुलैला त्याचा ताबा सावंतवाडी पोलिसांनी घेतला होता. दीड महिन्यांपूर्वी शहरात तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. यातील दोन चोऱ्यांबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात मानेचा हात असल्याचे तपासात उघड झाले. यावेळी उपनिरीक्षक बाबू तेली यांनी एका चोरीचा तपास केला. यात तब्बल त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. या काळात संशयिताने चोरीचा मुद्देमाल शहरातून बाहेर जाणाऱ्या एका घाटीत टाकला, अशी कबुली पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्याला घटनास्थळावर नेऊन तपास केला होता. तर आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, शहरात घडलेल्या दुसऱ्या चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस त्याचा पुन्हा ताबा घेणार आहेत. तशी मागणी न्यायालयाकडे केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83329 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..