
देवगड भाजप महिला मोर्चा पदाधिकारी नियुक्त
४०२८४
देवगड ः येथे नियक्तीपत्रे देताना आमदार नीतेश राणे. शेजारी अजित गोगटे.
देवगड भाजप महिला
मोर्चा पदाधिकारी नियुक्त
देवगड, ता. २ ः आमदार नीतेश राणे व माजी आमदार अजित गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड जामसंडे शहरातील भाजप महिला मोर्चा नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. नव्याने निवडी झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका श्रुती जाधव यांची देवगड उपाध्यक्षपदी, मृणाली भडसाळे यांची जामसंडे उपाध्यक्षपदी, नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची देवगड सरचिटणीसपदी तर वैदेही करंगुटकर यांची सचिवपदी नियक्ती करण्यात आली आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, सदाशिव ओगले, संदीप साटम, आरिफ बगदादी, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, प्रकाश राणे उपस्थित होते.
--
४०२६७
दारुम ः गणवेश वाटप करताना सुनिंद्र सावंत, भरत चव्हाण. (छायाचित्र : एन. पावसकर)
दारुम शाळेत गणवेश वाटप
तळेरे ः दारुम (ता.कणकवली) येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मधील विद्यार्थ्यांना सरपंच सुनिंद्र सावंत आणि उपसरपंच भरत चव्हाण यांच्यातर्फे मोफत गणवेश वाटप करण्यात आले. सलग तीन-चार वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सरपंच सावंत व उपसरपंच चव्हाण यांच्या दातृत्वातून मुलांना दरवर्षी गणवेश दिले जातात. दोन वर्षांपूर्वी शाळेसाठी दोन लाखांचे क्रीडा, संगीत, प्रयोग साहित्य मिळवून दिले. शाळेचे स्लॅब गळू नये, म्हणून यावर्षी ताडपत्री मिळवून दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83344 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..