रत्नागिरी ः बोगस नोंदणी प्रकरणात आमदार, नातेवाईकांच्या गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः बोगस नोंदणी प्रकरणात आमदार, नातेवाईकांच्या गाड्या
रत्नागिरी ः बोगस नोंदणी प्रकरणात आमदार, नातेवाईकांच्या गाड्या

रत्नागिरी ः बोगस नोंदणी प्रकरणात आमदार, नातेवाईकांच्या गाड्या

sakal_logo
By

(बातमी वाचन करणे बाकी.)

बोगस नोंदणी प्रकरणात
आमदार, नातेवाइकांच्या गाड्या
---
एजंटाकडे संशयाचे बोट; कर्मचाऱ्याशी असलेल्या संधानाची चर्चा
रत्नागिरी, ता. २ ः वाहनांच्या बोगस नोंदणीचे जुने प्रकरण असले तरी आरटीओ कार्यालयाने २२ जणांना नव्याने दिलेल्या नोटिसांमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या वाहनांमध्ये आमदार, त्यांच्या नातेवाइकांच्या गाड्याही आहेत. काही जिल्ह्यांत आयुक्तांच्या विशेष आदेशानंतर टॅक्स भरून ही वाहने नियमित करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील टॅक्स भरलेल्या १०९ वाहनधारकांना आयुक्तांनी ती नियमित करावी, अशी मागणी आहे.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या प्रकरणाने बोगस वाहननोंदणीचे प्रकरण चांगलेच चर्चेला आहे. जुने प्रकरण असल्याने कर्तव्यावर असलेल्या विद्यमानअधिकाऱ्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही; मात्र एक बाजू पुढे आल्याने एजंटांना दोषी धरले जात असले तरी संपूर्ण ऑनलाइन सिस्टीमचे नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या हाती आहेत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्याशी संधान असल्याशिवाय एवढा मोठा घोळ होणार नाही. यामध्ये फक्त एजंटच बदनाम होत आहेत, असा सूर बहुतांशी एजंटचा आज होता. ऑनलाइन नोंदणीत पळवाट शोधत चासिस नंबरमध्ये जादा डॉट टाकून वाहनांच्या बोगस नोंदणी करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील १३६ वाहनांचा समावेश होता. यापैकी १०९ जणांनी टॅक्स भरला असून,२२ जणांना टॅक्स भरण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसात त्यांनी टॅक्स भरला नाही तर वाहननोंदणी रद्द होण्याची भिती आहे. बोगस नोंदणीमुळे १७ लाख ४९ हजाराचा टॅक्स आणि पसंती क्रमांकाचे ८ लाख ७९ हजार शासनाचा महसूल या घोळामुळे बुडाला आहे.
बोगस नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये अनेक कंपन्यांच्या नवीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सिंधुदुर्गमधील आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांच्या नातेवाइकांच्याही गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. परिवहन आयुक्तांकडे मागणी करून त्यापैकी काही वाहनांची टॅक्स भरून घेऊन नियमित नोंदणी करण्यात आली आहे. रत्नागिरीतीलही १०९ वाहनधारकांना आयुक्तांनी विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83345 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..