चिपळूण ः भाजीमंडईत पुन्हा अतिक्रमणचा खटाटोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः भाजीमंडईत  पुन्हा अतिक्रमणचा खटाटोप
चिपळूण ः भाजीमंडईत पुन्हा अतिक्रमणचा खटाटोप

चिपळूण ः भाजीमंडईत पुन्हा अतिक्रमणचा खटाटोप

sakal_logo
By

भाजीमंडईत अतिक्रमणाचा प्रयत्न रोखला

चिपळूण पालिकेची कारवाई; तारेचे कुंपण निरूपयोगी, संबंधितांना तंबी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः येथील महर्षी कर्वे भाजीमंडईच्या आवारात अतिक्रमण रोखण्यासाठी तारेचे कुंपण घातलेले असताना देखील काही भाजी व्यावसायिक तिथे पुन्हा अतिक्रमणासाठी खटाटोप करत आहेत. त्यासाठी काहींनी सिमेंटचे खांब उभारण्याचे काम सुरू केलेले असतानाच नगर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा प्रयत्न हाणून पाडला. तसेच संबंधितांना तंबी दिली.
सध्या बाजारपेठेतील रस्त्यालगत भाजीविक्रेते व अन्य व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यातच महर्षी कर्वे भाजीमंडईच्या दर्शनी भागात फेरीवाले व भाजी व्यावसायिकांनी अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नगर पालिकेने चक्क तारेचे कुंपण घातले. तसेच या जागेत कोणत्याही व्यावसायिकाने अतिक्रमण करू नये, असे आवाहनही केले होते; परंतु त्या ठिकाणच्या भाजीविक्रेत्यांनी नगर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद न देता आतमध्येच दुकाने थाटली; मात्र आता त्या दुकानांवर छत उभारण्यासाठी काहींचा खटाटोप सुरू झाला आहे. त्यासाठी काहींनी सिमेंटचे खांब आणून छत उभारण्याचा प्रयत्न देखील केला. मंगळवारी सकाळी हा प्रयत्न लक्षात येताच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर तत्काळ कारवाई केली.
...
चौकट
५२ ओटे व बहुतांशी गाळे रिकामे
गेल्या अनेक वर्षापासून महर्षी कर्वे मंडई इमारत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वादग्रस्त ठरत आहे. अजूनही या इमारतीतील ५२ ओटे व बहुतांशी गाळे रिकामे आहेत. त्यासाठी अनेकदा लिलाव प्रक्रिया राबवूनदेखील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळालेला नाही. मूल्यांकनानंतर भाडेदरात देखील आता घट झाली आहे; परंतु भाजीमंडई आवारातच रस्त्यालगत काहींनी दुकानं थाटली आहेत. त्याचा परिणाम आतील गाळे व ओट्यांच्या लिलाव प्रक्रियेवर होत आहे. त्यामुळे नगर पालिकेने तारेचे कुंपण घालून उपाययोजना केली असली तरी सपशेल फोल ठरली आहे. दर्शनी भागात कुंपण व अतिक्रमण झाल्याने या विषयी मंडईतील अधिकृत गाळेधारकांमधून ओरड सुरू झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83356 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top