कणकवली : संशयीतास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : संशयीतास अटक
कणकवली : संशयीतास अटक

कणकवली : संशयीतास अटक

sakal_logo
By

मोबाईल स्वस्त देण्याच्या
बहाण्याने फसवणूक

राजस्थान येथील तरुणाला अटक

कणकवली,ता. २ ः महागडा मोबाईल स्वस्त देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान येथील संशयिताला आज पोलिसांनी अटक केली. नरेश पुष्कराज मीना (वय २१ रा. सवाईमाधवपुर), असे संशयिताचे नाव आहे. येथील न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी ही माहिती दिली.
विशेष म्हणजे हा तरुण सामान्य कुटुंबातील असून तो पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. याबाबत विनायक विवेकानंद सावंत (वय २६ रा. कणकवली) यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली होती. जुलै २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता. फिर्यादी श्री. सावंत यांना आयफोन खरेदी करायचा असल्याने त्यांनी सोशल मीडियावरील जाहिरात पाहिली. या जाहिरातीत अठरा हजारात महागडा मोबाईल मिळणार होता. संशयिताने ‘आयुष गोस्वामी बोलतोय’, असे सांगितले. त्यानंतर एक क्यूआर कोड पाठवला. क्यूआर कोडद्वारे अठरा हजार भरल्यानंतरही मोबाईल मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्री. सावंत यांनी येथील पोलिसांत गेल्यावर्षी फिर्याद दाखल केली होती. सखोल पोलिस तपासानंतर राजस्थान - सवाईमाधवपुरमधून संशयिताला ताब्यात घेतले; मात्र, तो पदवीच्या दुसऱ्या वर्षात असल्याने त्याची परीक्षा सुरू होती. अखेर आज तो येथील पोलिसांत हजर झाल्यानंतर त्याला अटक झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83360 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top