जिल्ह्याबाहेर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याबाहेर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्‍या
जिल्ह्याबाहेर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्‍या

जिल्ह्याबाहेर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्‍या

sakal_logo
By

19P29019

जिल्ह्याबाहेर तीन वैद्यकीय
अधिकाऱ्यांच्या बदल्‍या

आरोग्य यंत्रणेवर परिणाम शक्य

कणकवली, ता.3 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये अनेक पदे रिक्त असताना राज्य शासनाने जिल्ह्यातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या केल्या आहेत. मात्र रिक्‍त जागी अन्य डॉक्‍टरांची नियुक्‍ती झाली नसल्‍याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणखी कोलमडण्याची शक्‍यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा जिवंत ठेवण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, त्यात प्रामुख्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांची नाशिक जिल्हा रुग्णालयात वर्ग एक पदावर पदोन्नतीने बदली झाली. डॉ.शिकलगार यांनी अनेक वर्षे कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात लोकाभिमुख सेवा दिली आहे.
कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारे स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद वालावलकर यांचीही पदोन्नतीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बदली झाली आहे. हे पद देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त असताना देखील त्यांना जिल्ह्याबाहेर पदोन्नती देण्यात आली आहे. तर कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कणकवलीचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांची देखील पदोन्नतीने वैद्यकीय अधीक्षक या पदावर ग्रामीण रुग्णालय वाडा जिल्हा पालघर येथे बदली करण्यात आली आहे. डॉ. संजय पोळ यांनी गेली अनेक वर्षे कणकवली तालुक्याचा प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला. कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र सोबतच तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी कोरोना काळातही यशस्वी व महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. अशा स्थितीत या तन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नती झालेल्या जागा जिल्ह्यात रिक्त असून देखील या अधिकाऱ्यांच्या बदल्या थेट जिल्ह्याबाहेर केल्या गेल्याने रूग्‍णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83466 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..