
फोटोसंक्षिप्त
L४०५२८
ओळ - कणकवली ः वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसोबत कणकवली रोटरीचे वर्षा बांदेकर, दीपक बेलवलकर, रवींद्र मुसळे, मेघा गांगण, उषा परब आदी.
कणकवलीतील वक्तृत्व स्पर्धेत
तळेरे महाविद्यालयाचे यश
तळेरे ः रोटरी क्लब, कणकवली आयोजित (कै.) विष्णू शंकर पडते स्मृती वक्तृत्व स्पर्धा कणकवली येथे पार पडली. या स्पर्धेत अकरावी ते पदवी या महाविद्यालयीन गटातून येथील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. महाविद्यालयीन गटामधून मिताली चव्हाण हिने प्रथम, तर स्नेहल तळेकर हिने व्दितीय क्रमांक मिळविला. विराज नांदलस्कर याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना प्राध्यापिका एस. एन्. जाधव, सहाय्यक शिक्षिका पी. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना कणकवली रोटरी क्लबचे रोटरीयन वर्षा बांदेकर, दीपक बेलवलकर, रवींद्र मुसळे, मेघा गांगण, उषा परब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यशस्वीतांचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक, प्रवीण वरुणकर, शरद वायंगणकर, दिलीप तळेकर, संतोष जठार, संतोष तळेकर, नीलेश सोरप, उमेश कदम, प्रा. अविनाश मांजरेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
..................
तळेरेत ११ ला
''नारळ लढविणे''
तळेरेः बाजारपेठ मित्रमंडळ, तळेरेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त प्रथमच भव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आय़ोजन केले आहे. ही स्पर्धा तळेरे बाजारपेठ येथे ११ ला दुपारी २.०० वाजता होणार आहे. प्रथम विजेत्यास ५००१ रुपये (नागेश पाळेकर, शिवम खटावकर पुरस्कृत), तर द्वितीय क्रमांकास ३००१ रुपये (सचिन पाटील पुरस्कृत) अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. पहिल्या ६४ स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल. स्पर्धक वाढल्यास आणखी आठ स्पर्धकांना संधी दिली जाईल. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना मंडळाकडून पाच नारळ देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी स्वप्नील कल्याणकर, आप्पा कल्याणकर यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83558 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..