
दाभोळ-20 वर्षे पुलाच्या दुरुस्तीला वेळच नाही
करजगावमधील पूलः लोगो
...
-rat३p१७.jpg
40456
ः करजगाव ः पुलाच्या मोऱ्या वाहून गेल्याने पुलाची झालेली अवस्था.
-----------
पूल उपयोग शून्य; २० वर्ष दुर्लक्ष अनाकलनीय!
दुरूस्तीसाठी यंत्रणेकडे वेळच नाही; नागरिकांना होतोय त्रास
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ३ ः दापोली तालुक्यातील बुरोंडी मुकादमवाडी ते करजगांव वाडीला जोडणाऱ्या पुलाची दुरुस्ती न झाल्याने या पुलाचा वाहतुकीस उपयोग होत नाही. गेली २० वर्षे या पुलाची दुरुस्ती न झाल्याने स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून हा पूल नक्की कशासाठी बांधला होता, अशी विचारणाही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पुलाला जोडणारा करजगाव बाजूचा जोड (अॅप्रोच) रस्ता वाहून गेला असल्याने तसेच पुलाच्या मोऱ्याही वाहून गेल्या असल्याने या पुलाचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिकांना अन्य मार्गे वळसा घालून बुरोंडी तसेच करजगाव येथे जाण्याची वेळ येत असल्याने शाळेत जाणारी मुले, वयोवृद्ध नागरिक, गरोदर स्त्रिया, मोहल्ल्यात कामाला जाणारे नागरिक यांना त्रासाला समोरे जावे लागते.
...
चौकट
शासकीय यंत्रणा ढिम्म
या संदर्भात बुरोंडी येथील नागरिक हाफिज मुकादम म्हणाले, पुलाला जोडणारा रस्ता पहिल्याचा वर्षी वाहून गेला असून पुलाच्या मोऱ्या वाहून जाऊन २० वर्ष झाली आहेत; मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे या पूल बांधण्याचा उद्देश सफल झालेला नाही व शासनाचा व पर्यायाने नागरिकांनी भरलेल्या कराचा पैसा वाया गेला आहे. या पुलाला जोडणारा रस्ता करावा व पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83566 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..