चिपळुणातील तीन उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणातील तीन उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा गौरव
चिपळुणातील तीन उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा गौरव

चिपळुणातील तीन उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा गौरव

sakal_logo
By

ratchl33.jpg
40535
रत्नागिरीः तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांचा सन्मान करताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील.
------------
चिपळुणातील तीन उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा गौरव
महसूल दिन ; आपत्ती काळातील कामगिरीची दखल
चिपळूण, ता. ३ः गतवर्षीच्या महापुरानंतर घेतलेली मेहनत, लोकसहभागातून राबवलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवलेले आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, वंचित घटाकासाठी राबवलेले अनोखे प्रयोग आदी विविध बाबींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चिपळुणातील तीन अधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव केला आहे. महसूल दिनी चिपळूणचे प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मंडळ अधिकारी उमेश गिज्जेवार यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या ३ वर्षांपासून येथील महसूल विभागात उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी व मंडळ अधिकारी उमेश गिज्जेवार कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी कोरोना कालावधीत मोठे योगदान दिले होते. गतवर्षी आलेला महापूर, त्यानंतर राबवण्यात आलेल्या उपाययोजना या साऱ्यांची दखल घेण्यात आली. या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले आहे. दरडग्रस्त भागात लोकसहभागातून पुनर्वसन झालेल्या लोकांना घरे बांधून दिली. त्याचबरोबर दरडग्रस्त भागात आपत्तीविषयक विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या. ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. धनगर समाजासाठी तर प्रांताधिकार्‍यांनी अनोखे अभियान राबवले. धनगर समाजाला शिक्षण, शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळण्यासाठी प्रशासन धनगर समाजाच्या वाडीवस्तीवर पोहोचले. एकाचवेळी सुमारे ५५० दाखले देण्यात आले. धनगर समाजाच्या इतिहासात मोलाची बाब ठरली. या उपक्रमाचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. कोरोना, महापूर अथवा वाशिष्ठी शिवनदीतील गाळ काढण्याबाबत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी महसूल विभागात केलेल्या प्रामाणिक सेवेची जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दखल घेत उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करत त्यांचा सन्मान केला. रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक मोहिमकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83613 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..