तर ईट का जवाब पत्थर से देंगे, सामंत समर्थकांचा शिवसेनेला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तर ईट का जवाब पत्थर से देंगे, सामंत समर्थकांचा शिवसेनेला इशारा
रत्नागिरी ः...तर ईट का जवाब पत्थर से देंगे

तर ईट का जवाब पत्थर से देंगे, सामंत समर्थकांचा शिवसेनेला इशारा

रत्नागिरी : पुण्यामध्ये शिवसैनिकांनी आमदार उदय सामंत यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. त्या हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. संयम ठेवला आहे, म्हणून सामंतांबाबत असा विचार कोणी करत असाल तर त्यांना ईट का जवाब पत्थरसे देंगे, असा इशारा कट्टर सामंत समर्थक तुषार साळवी यांनी दिला.रत्नागिरीतील युवा नेतृत्व साळवी हे उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीतील शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत आम्ही सामंतांबरोबर असल्याचे ठणकावणारे म्हणून साळवी यांची ओळख आहे. पुण्यातील प्रकारानंतर साळवी यांनी तरुण समर्थक कार्यकर्त्यांसह बुधवारी (ता. ३) सकाळी आमदार सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात धाव घेतली.

हल्ला करणाऱ्‍यांविरोधात कार्यालयाबाहेर समर्थकांनी जाहीर निषेध नोंदवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना साळवी म्हणाले, आमदार सामंत हे रत्नागिरीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. अशा व्यक्तींच्या विरोधात असला भ्याडपणा कोणी करणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. राजकारणामध्ये कार्यरत सामंत यांनी आतापर्यंत वैचारिक पातळी कधीच सोडलेली नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीविरोधात जाणूनबुजून कोणी षडयंत्र रचत असतील तर ते कदापी सहन करणार नाही. हल्लेखोरांनी लक्षात ठेवले पाहिजे की, तुमच्या घरात शिरून फटके देण्याची आमच्यामध्येही धमक आहे.

हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडा
पोलिस प्रशासनाला विनंती करताना ते म्हणाले, सामंत यांच्यावर हल्ला करणाऱ्‍यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात असली भ्याड कृत्यं त्यांच्या हातून होणार नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83637 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..