वैज्ञानिक दृष्‍टीकोन आत्‍मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैज्ञानिक दृष्‍टीकोन आत्‍मसात करा
वैज्ञानिक दृष्‍टीकोन आत्‍मसात करा

वैज्ञानिक दृष्‍टीकोन आत्‍मसात करा

sakal_logo
By

40564
कणकवली : येथील कणकवली कॉलेजमधील मायक्रोबायॉलॉजिस्ट युनिटचे उद्‌घाटन करताना डॉ. राजश्री साळुंखे. शेजारी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले आदी.


वैज्ञानिक दृष्‍टीकोन आत्‍मसात करा

डॉ. राजश्री साळुंखे : कणकवली कॉलेजमधील मायक्रोबायॉलॉजिस्ट युनिट

कणकवली, ता.३ : वैज्ञानिक दृष्‍टीकोन हा केवळ अभ्यासासाठी नाही तर दैनंदिन जीवनातही आत्मसात व्हायला हवा. तसेच आपल्‍या आयुष्यात चांगले आदर्श असतील तरच आपण चांगले भविष्य घडवू शकतो, असे मत कणकवली कॉलेजच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी व्यक्‍त केले.
कणकवली कॉलेज कणकवली, सूक्ष्मजीव शास्त्र विभागामध्ये मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्टुडंट युनिटची स्थापना करण्यात आली. याचे उद्‌घाटन डॉ. साळुंखे यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले डॉ. संदीप साळुंखे, प्रा. डॉ. शामराव दिसले, प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. चैतन्य रावराणे, प्रा. सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले म्हणाले की, प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. वैज्ञानिक प्रगती मोठ्या वेगाने होत चालली आहे. बदलत्या काळाबरोबर बदलत असताना आपले वेगळेपण जपणंही आवश्यक आहे. डॉ. चैतन्य रावराणे, यांनी विद्यार्थ्यांना प्रदेशांमध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. संदीप साळुंखे यांनी सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ करत असलेल्या कार्यामुळे आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो, असे मत मांडले. प्रा.सुरेश पाटील यांनी मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांची उद्दिष्टे भविष्यामध्ये सूक्ष्मजीव शास्त्र विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम व सूक्ष्मजीव शास्त्र विषयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी याबाबत आढावा घेतला.
मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्टुडंट युनिट कणकवली कॉलेज अध्यक्ष आम्रपाली रणदिवे हिने सोसायटी मार्फत कसे कार्य केले जाईल, याबाबत माहिती दिली. प्रा. सुरेश पाटील, प्रा. गीतांजली नार्वेकर, प्रा. अरविंद उमरीकर, प्रा. पल्लवी गोखले, श्री. समीर तावडे, श्री गुरु सावंत, श्री. प्रमोद चव्हाण, श्री. मंगेश भोगले व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सानिका कासले व सिद्धी पालव यांनी सूत्रसंचालन केले. सेजल शेट्टी हिने आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83641 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..