फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L४०५७४

ओळ - पावशी ः अपघातावेळी झालेली गर्दी.

रिक्षा-दुचाकीत
पावशीत अपघात
कुडाळ, ता. ३ ः मुंबई-गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायत समोरील मिडल कट येथे आज रिक्षा व दुचाकी यांच्यात अपघात झाला. कुडाळवरून येणाऱ्या रिक्षाचालकाने अचानक मिडल कटच्या दिशेने रिक्षा वळवली व मागून येणारी दुचाकी ही रिक्षावर आदळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रिक्षाचे नुकसान झाले. एकंदरीत मिडल कटमुळे अपघात होत असून याबाबत वाहनचालकांमध्ये कोणतेही जनजागृती झालेली दिसून येत नाही.
-------------

देवगडात पावसाने
शेतकर्‍यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः तालुक्यात मंगळवारी रात्री पाऊस झाला. आज दिवसभर पावसाळी वातावरण तयार झाले होते; मात्र पाऊस झाला नाही. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा होती. अलीकडे पावसाने दडी मारली असल्याने रात्री झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला.
यंदा पावसाचे वेळापत्रक अनियमित झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला जोर धरलेल्या पावसाचा पुढील प्रवास मंदावला आहे. मध्यंतरी पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने कडक ऊनाच्या झळा जाणवत होत्या. पाऊस नसल्याने कातळी भागातील भातशेती अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे पावसाकडे डोळे लागले होते. त्यातच मंगळवारी (ता. २) रात्री तालुक्याच्या किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली. आजही पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. सायंकाळी पाऊस पडण्याची लक्षणे होती; मात्र पाऊस झाला नाही.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83649 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..